मी नव्या पिढीचा शिलेदार
मी नव्या पिढीचा शिलेदार-
प्रचंड स्पर्धेच्या लाटा थोपवणे हे माझे कर्तव्य आहे
जुन्यांचे जनुक जिवंत ठेवण्याच्या तकलादू धडपडी
प्रतिक्रांती करण्याचे नाना मनसुबे, कट ओळखणे,
हे माझे कर्तव्य आहे.
धर्माचे राजकारण नव्या पिढीला भोवत नाही
"कन्फ्युज एंड रूल" चा नवा मंत्र आणलाय
आता सध्या थोडा फावला, मात्र सत्तेसाठी फोल
मला हा गोंधळ सावरला पाहिजे
हे माझे कर्तव्य आहे.
धर्मांधतेचा नियोजित कट करणा-या
देशद्रोह्यांना वाचक बसावा असा कानमंत्र
नव्या पिढीला द्यायला हवा
नाहीच ऐकलं तर. . .
रक्ताचा स्फोट मंगतातून झाल्याशिवाय
देशद्रोह्यांचे मूळ नष्ट होणार नाही
"हि मुले उखडून फेका"
हि ललकारी देणे माझे कर्तव्य आहे.
माझ्या येणा-या सळसळत्या भविष्य-
जनमान्य आधीच गर्भ काळी कुस्करणारा,
मेळघाटातील कुपोषित समाज निर्माण करणारा
इतिहास ज्ञात ठेव,
भर सभेत सत्य सांगणारा चार्वाक खाक केला
सुतराम पुरावा हाती लागू नये म्हणून पानं नं पान भस्म केले.
त्रिपिटकाचे प्रक्षिप्त वादातोव्याघाती कृत्य केले
अथेन्सचा सोक्रेटीस असाच हेमलॉक बळी दिला
आमच्या साम्रातांचेही यांनी असेच दमन केले
त्यांच्या अशा प्रतीक्रांत्या यशस्वी का?
याचे उत्तर शोधणे माझे कर्तव्य आहे.
संगणकाच सराईत युग आलं
काही कळण्या आधीच स्मार्ट पिढीची
संगणकाच्या कीबोर्डवर सळसळणारी बोटं
नव्या समृद्ध जीवनाची नांदी आहे
बाळाचे पाय पाळण्यातच दिसू लागले आहे.
तर्क, अनुमान, अन्विक्षिकीला इथे नाही थारा
तुमच्या जुन्या पुराणकथा, जातककथा,
चुरस आणि चमत्कारिक कल्पनाविश्व;
तुमचे महाकाव्य, वेद, आदर्शवाद धुद्कावेल
आणि म्हणेल, -"बाप दाखव; नाही तर श्राद्ध कर"
तसे काळाच्या नेहमीच पुढे तुम्ही राहिले
आताही काही मागे राहणार नाही.
तुमचे डावपेच मी ओळखून आहे.
तुमचे 'कन्फुज एंड रूल' चे तंत्र
कायम ठेवत पंचातान्त्राला बदलून
तुमच्या सर्व अनाकलनीय, अज्ञेय, पारलौकिक, साक्षात्कारी कथांना
तुम्ही वास्तवदर्शी करणार आणि फोकनाड कथा
तुम्ही पुन्हा नव्या पिढीवर लादणार,
ईश्वराचे मानवीकरण करणार
प्रक्षिप्त इतिहासाला नवसंजीवनी देणार
आणि पुन्हा अंधःकारत येणा-या पिढीचा कडेलोट करून
त्यांच्या टाळूवरचे लोणी खाणार!
पुन्हा तेच. . .
हे घडण्य आधी ; पिढी नासण्या आधी,
सतर्कतेचा इशारा देऊन तुमचेच दात तुमच्याच घशात घालणे
हे माझे कर्तव्य आहे. . . . . . .
- - - - - पद्माकर तामगाडगे मुंबई - - - -
यासाठी आत्मभान वाढवणारी जागृती, सम्मा सति, वाढवावी लागणार सर. कारण मला माझं भान नाही हेच मी कन्फ्युज होण्यामागच कारण आहे.
ReplyDelete