पेटलेल्या पालित्यांना आता विझवू नको
अंगार होई शृंगार आता अडवू नको.
इतिहास आठवून ओथंबेल कारुण्य
न्यायाच्या समशेरीला आता फितवू नको.
असे किती उनाड वारे मज आठवले
दिवास्वप्न आम्हाला आता दाखवू नको.
ते आले गुलाम झाले दावणीला झोंबले
तत्वहीन मायावी(यक्षिणी) आता भुलवू नको.
जिथे प्रकाश होतो अधीर फोडण्या टाहो
अंधार फाकवा रे आता दडवू नको.
कुणी चाहुदिषा उजळावी सूर्य तेजाने
पेटू देत पलिते आता मालवू नको.
-----------पद्माकर तामगाडगे --------
अंगार होई शृंगार आता अडवू नको.
इतिहास आठवून ओथंबेल कारुण्य
न्यायाच्या समशेरीला आता फितवू नको.
असे किती उनाड वारे मज आठवले
दिवास्वप्न आम्हाला आता दाखवू नको.
ते आले गुलाम झाले दावणीला झोंबले
तत्वहीन मायावी(यक्षिणी) आता भुलवू नको.
जिथे प्रकाश होतो अधीर फोडण्या टाहो
अंधार फाकवा रे आता दडवू नको.
कुणी चाहुदिषा उजळावी सूर्य तेजाने
पेटू देत पलिते आता मालवू नको.
-----------पद्माकर तामगाडगे --------
Comments
Post a Comment