Skip to main content

मी नव्या पिढीचा शिलेदार

मी नव्या पिढीचा शिलेदार

मी नव्या पिढीचा शिलेदार-
प्रचंड स्पर्धेच्या लाटा थोपवणे हे माझे कर्तव्य आहे
जुन्यांचे जनुक जिवंत ठेवण्याच्या तकलादू धडपडी
प्रतिक्रांती करण्याचे नाना मनसुबे, कट ओळखणे,
हे माझे कर्तव्य आहे.
धर्माचे राजकारण नव्या पिढीला भोवत नाही
"कन्फ्युज एंड रूल" चा नवा मंत्र आणलाय
आता सध्या  थोडा फावला, मात्र सत्तेसाठी फोल
मला हा गोंधळ सावरला पाहिजे
हे माझे कर्तव्य आहे.
धर्मांधतेचा नियोजित कट करणा-या
देशद्रोह्यांना वाचक बसावा असा कानमंत्र
नव्या पिढीला द्यायला हवा
नाहीच ऐकलं तर. . .
रक्ताचा स्फोट मंगतातून झाल्याशिवाय
देशद्रोह्यांचे मूळ नष्ट होणार नाही
"हि मुले उखडून फेका"
हि ललकारी देणे माझे कर्तव्य आहे.
माझ्या येणा-या सळसळत्या भविष्य-
जनमान्य आधीच गर्भ काळी कुस्करणारा,
मेळघाटातील कुपोषित समाज निर्माण करणारा
इतिहास ज्ञात ठेव,
भर सभेत सत्य सांगणारा चार्वाक खाक केला
सुतराम पुरावा हाती लागू नये म्हणून पानं नं पान भस्म केले.
त्रिपिटकाचे प्रक्षिप्त वादातोव्याघाती कृत्य केले
अथेन्सचा सोक्रेटीस असाच हेमलॉक बळी दिला
आमच्या साम्रातांचेही यांनी असेच दमन केले
त्यांच्या अशा प्रतीक्रांत्या यशस्वी का?
याचे उत्तर शोधणे माझे कर्तव्य आहे.

संगणकाच सराईत युग आलं
काही कळण्या आधीच स्मार्ट पिढीची
संगणकाच्या कीबोर्डवर सळसळणारी बोटं
नव्या समृद्ध जीवनाची नांदी आहे
बाळाचे पाय पाळण्यातच दिसू लागले आहे.
तर्क, अनुमान, अन्विक्षिकीला इथे नाही थारा
तुमच्या जुन्या पुराणकथा, जातककथा,
चुरस आणि चमत्कारिक कल्पनाविश्व;
तुमचे महाकाव्य, वेद, आदर्शवाद धुद्कावेल
आणि म्हणेल, -"बाप दाखव; नाही तर श्राद्ध कर"
तसे काळाच्या नेहमीच पुढे तुम्ही राहिले
आताही काही मागे राहणार नाही.
तुमचे डावपेच मी ओळखून आहे.
तुमचे 'कन्फुज एंड रूल' चे तंत्र
कायम ठेवत पंचातान्त्राला बदलून
तुमच्या सर्व अनाकलनीय, अज्ञेय, पारलौकिक, साक्षात्कारी कथांना
तुम्ही वास्तवदर्शी करणार आणि फोकनाड कथा
तुम्ही पुन्हा नव्या पिढीवर लादणार,
ईश्वराचे मानवीकरण करणार
प्रक्षिप्त इतिहासाला नवसंजीवनी देणार
आणि पुन्हा अंधःकारत येणा-या पिढीचा कडेलोट करून
त्यांच्या टाळूवरचे लोणी खाणार!
पुन्हा तेच. . .
हे घडण्य आधी ; पिढी नासण्या आधी,
सतर्कतेचा इशारा देऊन तुमचेच दात तुमच्याच घशात घालणे 
हे माझे कर्तव्य आहे. . . . . . .  
        - - - - - पद्माकर तामगाडगे मुंबई - - - -

Comments

  1. यासाठी आत्मभान वाढवणारी जागृती, सम्मा सति, वाढवावी लागणार सर. कारण मला माझं भान नाही हेच मी कन्फ्युज होण्यामागच कारण आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

महिला सक्षमीकरण सुरु आहे. . .

|| सृजनवेध || महिला सक्षमीकरण सुरु आहे. . . - डॉ. पद्माकर तामगाडगे महिला सक्षमीकरणाची प्रक्रिया केव्हा पासून सुरु झाली ? याचा विचार केल्यास. लगेच ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन आठवतो आणि त्याच बरोबर आठवतो त्या घटनेमागील इतिहास. क्लारा जेटकिन या रूसी महिलेने सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला अधिवेशनाचा प्रस्ताव ठेवला होता . दर वर्षी ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जावा. तिने जगातील सर्व महिलांना आवाहन केले आणि पुरुष आणि महिलांमध्ये कुठल्याही प्रकारची दरी निर्माण होऊ नये. जर पुरुष झगडा करीत असेल तर महिलांनी शांत राहून सामंजस्याने विचार करून, शांतपणे लढावे. आणि मग १९११ पासून १९१५ पर्यंत सातत्याने ८ मार्च हा महिला दिवस म्हणून जगभर साजरा केला गेला. महिलांना संगठीत करण्यासाठी सेंट पीटर्सबर्ग शहरात ‘राबोनित्सा’ पत्रिका काढली गेली. आणि इथूनच महिलांवरील होणारे अन्याय अत्याचार, असमानता यांच्या विरोधात एक सक्षम नेतृत्व उभारल्या गेले. पहिल्या महायुद्धातील कालावधीत ओस्लो(नार्वे) मधील महिलांनी युद्धाचा निषेध दर्शविला, रशियन क्रांतीची सुरुवात ८ मार्च १९१...

मास्तर. ...

मास्तर... मास्तर..... समजूनच नाही राह्यलं पेरलं तेवढंय नायी उगवत लेकी-बायकोचंत सोडाच पण दोन येळंचं कसं भागन मास्तर तुम्हीच सांगा प्रॉब्लेम कोठी असंन? सालं वर्षानुवर्ष संकरीत बियाने दगा देऊन रायले आंब्याच्या झाडाले कावूनसन्या फनसं येऊन रायले आन बाभळीच्या झाडाले देखने फुलं येऊन रायले बापाच्या हातानं वावर फुलारलं होतं बाप गेल्यावर भावानं विदेशी एंड्रेल फवारली तवापासुनस काळी माय वांझोटी झाली रातदिस मशागत करून बापानं धम्माची टॉनिक पाजली होती तवा कणसं टरारून वर येत होती  भावा-भावात हिशे-वाटणी झाल्यावर  सुपीक माह्य अन कोरडं ठाण त्याचं? कायबी कळत नाय या फरकाचं  रातच्याले माह्या पिकावर  सोडते चराले अमेरिकन सांड आन डुर्कावते दोन्ही पायात हिल्गवून आंड मास्तर आता तुम्हीच सांगा  कुठवर देऊ या वावरावर ध्यान का घेऊ दोऱ्यात अडकवून मान? तू एक कर..... रगारगात आंबेडकर पेर बघ कसं डौलदार पिक येईल मनूच्या भूमीला भडास दे ! बघ कसे क्षणार्धात ठीक होईल. - पद्माकर तामगाडगे 

पद्माकर तामगाडगे यांचा "ग्लासनोस्त" कवितासंग्रह प्रकाशित

"ग्लासनोस्त"  या कवी पद्माकर तामगाडगे यांच्या कविता संग्रहाचे नुकतेच डॉ. बी. जी. पगारे यांच्या हस्ते मुंबई येथे  प्रकाशन झाले. प्रज्ञाप्रबोध प्रकाशन, सांगली प्रकाशनाने आयएसबी एन  क्रमांक देऊन "ग्लासनोस्त" हा कवितासंग्रह प्रकाशित केला. ग्लोबल कोलाज मांडणारी ही कविता मानवतेचे धगधगते वास्तव  चित्रित  करते.  सुप्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी "बोलणा-या निखा-याची कविता. . ." म्हणून नव्या समतामुलक समाजाचे दिशादिग्दर्शन ही पद्माकर तामगाडगे यांची  कविता करते  शिवाय तरुण पिढीलाही नवी वाट दाखवते. अशी नव्या पिढीची, नव्या वळणाची संयत कविता वाचकांनी मुळातच जरूर आस्वाद घ्यावा. कविता संग्रहाचे मुखपृष्ठ सुप्रसिद्ध चित्रकार बळी खैरे यांनी अतिशय बोलके काढले आहे. कवितेच्या "ग्लासनोस्त" या नावापासून,   दर्शनी भागापासूनच उत्सुकता निर्माण करणारा "ग्लासनोस्त" हा कवितासंग्रह एकदा तरी सर्व रसिक श्रोत्यांनी जरूर वाचवा.