टमरेलात पाणी भरून परसाकड जातो
तवा पानटपरीवरच्या एफेमवर दिल्ली केंद्राच्या बातम्या. . .
"देशाच्या आर्थिक चलनवाढीत दोन अंकी वाढ"
म्हणजे नेमकं काय हो भौ ?
टेक्नोलॉजी का फेक्नोलॉजी विकसित झाली
म्हणजे काय हो भौ ?
च्यायला सरकार बी च्युत्याच हाय. . .
तो ओबामा का कोण येऊन गेला
त्याचा गाव कोणता हो भौ ?
कम्प्युटर-फाम्प्यूटर का थे वावराच्या कामाचा मिशिन हाय ?
तुम्ही शिकले सावरले म्हणून इच्यारतो भौ !
सेझ-फेज कायले लावून खाते भौ ?
थे जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण
हे का नवं गजकरण हायेत ?
कंबर मोडीच्या पाल्यान पार पळते म्हणावं
लय जालीम रस त्याचा.
जखमेवर लावला का जीव जाते पण गुण येते.
नाही का भौ ?
आपल्या देशाले वाचवला पाहिजे का न्हाय भौ ?
पद्माकर तामगाडगे, मुंबई
ye hui na bat...kya mast photo ke sath hai dada...jago india jago...
ReplyDeletemastach chitra ubhe keley..
ReplyDeleteAgdich krantikari paddhtichi kavita. Jashi Sambhaji Bhagat, Vilas Ghogre yanchya laichi. Ekdam vastvic ani photohi marmik. Apratim.Agdich krantikari paddhtichi kavita. Jashi Sambhaji Bhagat, Vilas Ghogre yanchya laichi. Ekdam vastvic ani photohi marmik. Apratim.
ReplyDelete