![]() |
अस्वस्थ भारताचे चित्र . . .
मी अस्वस्थ भारताचे चित्र,
उघड्या डोळ्यांनी पाहतो. . .
तरुणांच्या अस्वस्थ गोंधळाला पाहतो,
पालकांच्या केविलवाण्या धडपडीला पाहतो,
आणि अस्वस्थ भारताचे चित्र रेखाटतो.
इथे प्रत्येकच श्वास अस्वस्थ. . .
श्रीमंत-गरीब,
स्त्री-पुरुष,
शोषक-शोषित,
भांडवलदार-मजूर,
शिक्षक-विध्यार्थी,
अधिकारी-कर्मचारी,
सरकार-शेतकरी,
अन~ खाऊन न पचलेला ढेरपोट्या आणि उपासने खपाटीला पोट गेलेला. . .
सत्तेत असणारे सत्ता टिकवण्यात,
सत्तेत नसणारे सत्ता काबीज करण्यात
जीवाचे रान, धनाची खान, अपराधाचे अगणित बाण,
लुंगे सुंगे, पोटाची थाळी, चोरी मारी,
धावा-धाव, अफरा-तफर, वाट दिसेल पळ सुसाट,
अस्ता-व्यस्त, रक्तपात, चामडी सोडा-अवयवाचा गोळा,
अस्वस्थ भारताचे चित्र . . . .. .
माणूस उध्वस्त. . . .
---------प्रा. पद्माकर तामगाडगे, मुंबई ---------
mast ga bhau dolyache parane firwanare kavya aahe ga..
ReplyDelete