कार्यकर्ता हो
चंदेरी कागदात गुंडाळून गांजलेल्या लोखंडाला
नवी झळाळी देतांना
एकदाच फक्त वीर रस बाकी आयुष्यभर एकंच भेरी
अनुयायांना ऐकावितांना बेदरकर जिभल्या सदैव मधाच्या वाटीत.
आणि आम्ही . . .
आयुष्यभर तन,मन,धनाने लढ्याचे रणशिंग घेऊन
धुकाधुकात्या विझल्या मशाली घेऊन,
मोर्चा पुढे खंबीर नेतृत्व, रक्त-रक्तातून सत्य,
मनगटातून अगणित सूर्य पेटवून थोपवून धरलेले
अन्याय अत्याचाराचे चाक्रीवात.
अन आमचे आदर्श नेतृत्व मात्र,
वाटाघाटीत' एसी रुममध्ये.
आम्ही सोसतो पोलिसांचा बेछुट लाठीमार,
अन नानाविध कलामांचे आयुष्यभर आजार,
कोर्ट काचे-यांचे आणि समाजद्रोही झाल्याचे "पदक".
आता आमच्या शिवाय
सारेच आदर्श्याचे फोटो पूजतात
जयंत्या-मयंत्या करतात
आम्ही मात्र गप्पगार, थंडगार, पश्चातापदग्ध.. . .
मित्रा ! तू तरुण आहेस; तन मन धनाने
दम तुझ्या निधड्या छातीत,
पण वाट आडवाटा संयमाने निवड
बेफाम कर्तृत्वाच्या वा-याने दम भर लाठीत . . .
घाल हरामांच्या पाठीत.
आत्ता कुठे पोहोचलो साठीत
हाती धत्तुरा !
प्रा. पद्माकर तामगाडगे
Comments
Post a Comment