"आंबेडकरवाद" वादच नको?
आंबेडकरवाद" म्हणजे धर्म जात पंथ या सगळ्यांच्या अतीत जाऊन. अखिल विश्वाच्या मानवाच्या कल्याणाचा नवा जीवन मार्ग आहे. भारताच्या दृष्टीने जर त्याचा विचार केला तर साठोत्तरी समाजातील जे काही स्थित्यंतरे झाली आहे ती केवळ आणि केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच झाली आहे. ग्रामीण समाज असो की शेतकरी, आदिवासी, शोषित-पिडीत, स्त्रिया इ. समाजातील तत्कालीन वंचित व दुर्लक्षित घटकांना या समाजव्यवस्थेने सर्व घटकांपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले. परंतु या घटकांना त्यांच्यावर होणारा अन्याय अत्याचार आजपर्यंत काळत नव्हता? कळला तरी व्यवस्थेच्या तटबंदिमुळे त्यांचे शब्द मुके होते. हीवास्तवता कुणीही नाकारू शकणार नाही. अतिशय दुर्लक्षित असणा-या अतिदुर्गम भागात शिक्षणाच्या सोयी उपलब्ध नव्हत्या, रस्ते, वीज, या भौतिक बाबी तर दूरच सध्या मुलभूत जीवनावश्यक गरजांचीही मारामार होती. या सगळ्या घटकांना स्वत्वभान नव्हते. ते स्वतःवर होणा-या अन्यायाला स्वतःच्या कर्माचे फळ समाजत होते. परिणामतः शतकानुशतके गुलामिचीच अवस्था या वर्गाची राहिली आहे. ही स्थिती बदलली त्यामागे काही घटना कारणीभूत आहे... एक म्हणजे टिळकांचे निधन होऊन स्वराज्याचे सूत्र, स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व महात्मा गांधींकडे आले. त्यानंतर या देशात अनेक इजम (ISM ) आले. मार्क्सवाद, समाजवाद, स्त्रीवाद, हिन्दुइजम इ., स्वातंत्र्याचे वेध लागलेली तरुण पिढी एकीकडे आणि सामाजिक समतेची लढाई लढणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समान प्रवाह एकाच वेळेत समान ताकतीने सुरु होते. नंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले. ही घटनाही देशातील पीडित, शोषितांच्या जीवनाला कलाटणी देणारीच होती. मात्र खरी उलथा-पालथ झाली ती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्य घटनेच्या अंमलबजावणीमुळे. भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून देशातील शेवटच्या माणसापर्यंत शिक्षण पोहचले की जे शिक्षण फक्त ब्राह्मणांनाच मिळायचे ते या घटनेच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचले. त्यातून ते सजग झाले व स्वतःवर होणारे अन्याय त्यांना कळू लागले. या घटना अंमलबजावणी नंतर आणखी एक घटना घडली ज्यामुळे विश्वातील अखिल माणसांचे डोळे दीपून गेले. ती म्हणजे “नाभूतोनाभाविष्यति" अशी धम्मचक्र प्रवर्तन या घटनेमुळे ग्रामीण शेतकरी, स्त्रिया शोषित पीडित-वंचित सगळेच खळबळून जागे झाले आणि आपआपले दु:ख कधी शब्दांच्या माध्यमातून साहित्याचा रूपातून, तर कधी त्या अन्यायाला प्रतिकार करून, न्याय्य मागणीसाठी लढा देऊन, अनेक चळवळी, आंदोलने उभी राहिली. त्याचे एकमेव कारण होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर. म्हणूनच बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर साहित्यातूनही नकार, विद्रोह आणि आत्मभान हे सगळ्याच साहित्य प्रवाहातूनही दिसते. केवळच "दलित" साहित्यावरच हा प्रभाव आहे तसेच साठोत्तरी साहित्यावर हा परिणाम आहे शिवाय ग्रामीण, स्त्रीवादी, आदिवासी इ,इ, सगळ्याच साहित्य व चळवळींचे प्रेरणास्थान हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरच आहे हे मान्य करावेच लागते.
बुद्धांचा धम्मसुद्धा डॉ. आंबेडकरांनीच पहिल्यांदा सर्वसामान्यांपर्यंत आणला. त्यामुळेच जगाला पुन्हा एकदा बुद्ध आणि त्यांचा धम्म दिसला. जर बाबासाहेब नसते तर आज बुद्धही कोणाला माहीत नसते ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सर्व नद्या जशा समुद्राला जाऊन मिळतात तसा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समुद्रासारखे आहे. सर्व प्रवाह त्यात सामावून घेता येतात की जे मानवतावादी आहे. त्यामुळे कुणीही "आंबेडकरवाद" या संकल्पानेशिवाय दुस-या संकल्पनेचा विचार करू नये.
पूर्वग्रह असल्यामुळे, व वैयक्तिक विरोधामुळे काही आंबेडकरी मंडळी केवळ विरोधासाठी विरोध म्हणून ही संकल्पना नाकारतात व बाबासाहेब आंबेडकरांना मागे सरतात. हा त्यांचा द्रोह आहे. केवळ "संकल्पनेचे श्रेय आपल्यालाच मिळावे इतर कुणालाही मिळू नये त्यासाठी रास्त असणाऱ्या "आंबेडकरवादी" संकल्पनेला वगळून आपापले घोडे पुढे दामटणे ही बाब नैतिकतेला धरून तर नाहीच आहे उलट अशा व्यक्तिवादी पूर्वग्रहीतांचा आंबेडकरी समाजास धोकाच आहे म्हणून अशा ढोंगी व स्वार्थी लोकांपासून वेळीच सावध झाले पाहिजे.
"आंबेडकरवाद" म्हणजे जात, धर्म, वंश, पंथ याच्या अतीत जाऊन स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय अशा मानवतावादाचे नाव आहे. जसे जय-भीम ला दुसरा पर्याय नाही तसेच आंबेडकरवादाला देखील पर्याय नाही.
--------जय भीम------
प्रा. डॉ. पद्माकर तामगाडगे, मुंबई.
VERY NICE ANSWER DADA.....GOOD WORK....REALLY APPRECIATING
ReplyDelete