विजयस्तंभ
गर्भगळीत करतील गनिमा
शूर असा सरदार
संकट समयी आहे त्याची
सज्ज अशी तलवार
भीती त्याला नाही कुणाची
बाणा लढवय्या
समर भूमीला वंदन त्याचे
सदा असे तय्यार
अफाट छाती शूर मर्दाची
मिशा तशा भरदार
बांधून तो चालला कटीवर
तीक्ष्ण अशी तलवार
पेशवाईची फुगा फोडला
मोठ्या चतुराईने
सहस्त्रावधी वेशाव्यांचा
केला कुलसंहार
एकाशी शंभराची लढती
तीन दिवसाचे भुके जागती
हजार सैन्य पेशवाईचे
तरी गनीम झाले ठार
विजयाचा हा स्तंभच देईल
स्फूर्तीचे नवगान
भीमा कोरेगावचा
आम्हा सदा असे अभिमान
-"ग्लासनोस्त" या काव्य संग्रहातून. . . .
गर्भगळीत करतील गनिमा
शूर असा सरदार
संकट समयी आहे त्याची
सज्ज अशी तलवार
भीती त्याला नाही कुणाची
बाणा लढवय्या
समर भूमीला वंदन त्याचे
सदा असे तय्यार
अफाट छाती शूर मर्दाची
मिशा तशा भरदार
बांधून तो चालला कटीवर
तीक्ष्ण अशी तलवार
पेशवाईची फुगा फोडला
मोठ्या चतुराईने
सहस्त्रावधी वेशाव्यांचा
केला कुलसंहार
एकाशी शंभराची लढती
तीन दिवसाचे भुके जागती
हजार सैन्य पेशवाईचे
तरी गनीम झाले ठार
विजयाचा हा स्तंभच देईल
स्फूर्तीचे नवगान
भीमा कोरेगावचा
आम्हा सदा असे अभिमान
-"ग्लासनोस्त" या काव्य संग्रहातून. . . .
सर नमस्कार,
ReplyDeleteआजच विजयस्तंभासमोर नतमस्तक होवून आलो. संदर्भ चाळत असता आपली कविता भेटली. आवडली. अप्रतिम.
आपला,
संतोष डुकरे, पुणे.