पुष्यमित्र शुंग आणि आचार्य यज्ञेश्वर "एतं बुद्धानं सासनं" या नाटकाचे एक दृश्य |
तुझे मत तू सांग, तुला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे.
माझे मत तू ऐक, प्रतिक्रिया दे शब्दानेच.
विचाराची देवाण-घेवाण कर-पूर्वग्रह सोडून
सत्यान्वेषण कर, अंतिम निकाषाच्या परम पातळीपर्यंत
आणि ठाम होऊन म्हण -"हेच ते सत्य!"
आता तुला सज्ज व्हावं लागेल प्रत्युत्ताराला
इथले प्रत्येकच हाथ तुझ्या गळ्यापर्यंत येईल.
तुझा चार्वाक, सोक्रेटीस करण्याचा मनसुबा घेऊन
तुला तात्विक सत्यान्वेषातून हरविणे दुरापास्त?
मग तुला विक्षिप्त , वेडा ठरवून ,
नव्या परीकथा, जातककथा, सुरस-चमत्कारिक कथा जन्माला घालून,
पांडित्य काखेत अडकवून, हाती शस्त्र घेऊन,
आणि प्रतीक्रांतीची बीजे शिताफीने रुजवून,
आपल्याच हाताने आपलेच मुडदे पडून,
संभाव्य सत्य काही वर्ष निपचित दडविता येईल.
तुझा हळूहळू इतिहास होईल,
एखादाच !. . . . मुडदा उकरून काढील
तो तुझे सत्य जाणेल, तुझा अनुयायी होईल,
तुझ्या मताचा, तत्वाचा सत्य पट मांडेल,
तुझे हौतात्म्य फळा येईल न येईल. . .
आणि चक्र पुन्हा गतिमान होईल
अशातच . . . . .
पुन्हा क्रांती आणि प्रतिक्रांती
इतिहासाची नित्य पुनरावृत्ती .
सावधान . . . . प्रतिक्रांती येत आहे. . . .
-----पतुता -----
Comments
Post a Comment