आंबेडकरी जनता कुठे?. . . . .काही प्रश्न?
"आरक्षण " हा भारतीय घटनेतील भारतीय शोषित, पिडीत, वंचितांच्या उद्धार करिता दिलेला घटनादत्त अधिकार आहे याला. अनेक बाह्यात्कारी स्वत:ला आंबेडकरी, दलितांचे कैवारी म्हणून आजवरी मिरवून घेतले. राजकीय पक्ष्यांचे तसेच आणि समाज कार्य म्हणून मिरविणारे हि एकाच मालेचे मणी ठरलेत. "आज आरक्षण आम्हाला नको" असे बेजबाबदार विधाने करणारी स्वत:ला बडी आसामी म्हणविनारीही उपद्व्यापी समाजात काही कमी नाही. त्यांना फक्त शहरातील सोयी सुविधा मिळाल्या आणि बाबासाहेबांना प्रत्येक ठिकाणी भांडवल म्हणून त्यांचा आणि त्यांच्या नावाचा उपयोग करवून यशाच्या पाया-या ते चढलेत मात्र ८०-९० टक्के समाज आजही कुठे आहे?. . . याचा या सत्तेत धुंद असणाऱ्या, कैफात मशगूल असणा-या आंबेडकरी द्रोह्यांना त्यांच्या कफल्लक, दारिद्र्याचे पुरावे कुठून सापडणार? त्यांच्यावर होत असणा-या अनेक जातीय, धार्मिक अन्यायाला वाचा कोण फोडणार? त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी कोण घेणार? त्यांना आर्थिक वर्गीय समतेच्या अयारीवर कोण आणून बसविणार?
हे आणि असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरीत आहे डॉ. बाबासाहेबांच्या नंतर आम्हाला दुरदर्शी नेतृत्व लाभल नाही. कारण आम्ही फक्त तुकड्यांवर मौज केल्या. तळागाळातील वंचितांना शिक्षणासाठी आम्ही संस्था उभारण्याचे सोडून राजकीय पक्ष्यांच्या फेकलेल्या तुकड्यांवर धन्यता मानली. का ? आमच्या स्वतंत्र बाण्याने आम्हाला निवडणुका लढवून आम्हाला सत्ता मिळू शकली नसती? आमचे आंबेडकरी बांधव वैचारिक दृष्ट्या एवढे खालावले होते? त्यांच्यातील नैतिक संवेदनशीलता स्खलन पावली होती? याचे उत्तर प्रत्येक आंबेडकरी रक्तांच्या माणसाजवळ आहे. आज डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या "पीपल्स एज्युकेशन सोसिती" चे काय हाल आहे? बाबासाहेबांनी संस्थेच्या घटनेत विध्यार्थ्यांना काम-धंदा करून शिकता यावे म्हणून सकाळचे महाविद्यालय सुरु केले. त्यांच्या राहण्याची सिद्धार्थ विहार वसतीगृहाची स्थापना केली. आज या सगळ्या गोष्टींचे गांभीर्य कुठे गेले? विध्यार्थी शिक्षणासाठी महाविद्यालयात येत नाही तो फक्त कोलेज लीफ एन्जोय करण्यासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतो आणि "earn and learn" ही बाबासाहेबांची भूमिका फक्त "admission and Earn" अशी झाली आहे. तात्पर्य असे की बाबासाहेबांना संपूर्ण समाजाचे उत्थापन, उद्धार होणे अपेक्षित होते त्यामुळे त्यांनी शिक्षणाकडे अधिक लक्ष दिले मात्र आज घडीचे आमचे नेतेही बोलून चालून प्रतिगाम्यांच्या दावणीला जावून त्यांचीच भाषा बोलायला लागलेत. नव्या शैषणिक संस्था नाही निदान आहे त्या संस्थांचे तरी सुयोग्य व्यवस्थापन करा? एक दिवस असाच येईल आणि हाती धुपाटणे येईल हे नाकारताही येत नाही. पुरोगामी म्हणविना-या महाराष्ट्रात सवर्णांच्या स्शैक्षणिक संस्थांना पेव फुटले आणि आमच्या विद्यार्थ्यांना आरक्षणाच्या (त्याही फक्त कागडो पत्री) मुठभर जागा? अनेक शैक्षणिक संस्थेत आजही आमच्या मागासवर्गीय स्कॉलर असणा-या विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गात घेतल्या जात नाही हे वास्तव आहे. आय आय ती चे फक्त एक उदाहरण झाले असे कित्येक उदाहरणे आजही मुग गिळून बुक्क्यांचा मार खात आहे आणि आमचे राजकीय वारसदार मात्र आरसमहाली पेंग घेत आहे बाता मात्र मोठ्या असतात. हे थांबवून नव्या उमेदीच्या तरुण पिढीने संभाव्य धोके लक्षात घेऊन नव्या संकल्पनांचा कृतियुक्त मार्ग शोधला पाहिजे.
म्हणून आज जे पांढरपेशी म्हणून आमच्यात वावरणारे आहे त्यांना देश्यातील बोटावर मोजता येणा-या अब्जोपातींना पाहून देश पुढे गेला असे वाटत असले तरी आजही हा देश आणि इथला शोषित पिडीत वंचित आंबेडकरी बांधव अनेक खस्ता खात जगण्याचे ओझे घेऊनच जबत आहे आमचे आदिवासी बांधवही २१ व्या शतकात सुद्धा कडब्याच्या पाल्यांचे बारीक भुकटी करून बेसन बनवून आणि मिठाच्या जागी वारुळातील लाल मुंग्यांचा वापर करून जेवण तयार करून पोट भारतात याकडे निदान संवेदनशील माणूस म्हणून बघा? विरोध कारण-यांनी स्वत:चे आणि आपल्या आंबेडकरी नैतिक भूमिकेकडे डोकावून जरी पहिले तरी त्यांना लक्षात येईल कि "लोकशाही. . .लोकशाही. . " च्या नावाने ओरडतात त्यांच्या भुमिके विषयी आता आंबेडकरी जनतेला निबिड संशय येत आहे. सावधान! . . . . .
प्रा. डॉ. पद्माकर तामगाडगे, मुंबई.
Comments
Post a Comment