देश वाचला पाहिजे टमरेलात पाणी भरून परसाकड जातो तवा पानटपरीवरच्या एफेमवर दिल्ली केंद्राच्या बातम्या. . . "देशाच्या आर्थिक चलनवाढीत दोन अंकी वाढ" म्हणजे नेमकं काय हो भौ ? टेक्नोलॉजी का फेक्नोलॉजी विकसित झाली म्हणजे काय हो भौ ? च्यायला सरकार बी च्युत्याच हाय. . . तो ओबामा का कोण येऊन गेला त्याचा गाव कोणता हो भौ ? कम्प्युटर-फाम्प्यूटर का थे वावराच्या कामाचा मिशिन हाय ? तुम्ही शिकले सावरले म्हणून इच्यारतो भौ ! सेझ-फेज कायले लावून खाते भौ ? थे जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण हे का नवं गजकरण हायेत ? कंबर मोडीच्या पाल्यान पार पळते म्हणावं लय जालीम रस त्याचा. जखमेवर लावला का जीव जाते पण गुण येते. नाही का भौ ? आपल्या देशाले वाचवला पाहिजे का न्हाय भौ ? पद्माकर तामगाडगे, मुंबई