Skip to main content

Posts

कवितेचा जन्म?

कविता साहित्य प्रकार  “Read not to contradict and confute, nor to believe and take for granted, nor to find talk and discourse, but to weigh and consider” -Francis Bacon (1561-1626) “प्रतिवाद करण्यासाठी म्हणून किंवा खंडन करण्यासाठी म्हणून वाचन करू नका किंवा विश्वास ठेवण्यासाठी म्हणून किंवा गृहीत धरण्यासाठी म्हणून किंवा चर्चा करण्यासाठी किंवा विवेचानासाठी म्हणून देखील वाचन करू नका. तर वाचन करा समर्थ होण्यासाठी म्हणून, स्वतंत्रपणे विचार करण्यासाठी म्हणून.” -फ्रान्सिस बेकन(१५६१-१६२६) माणसाला जशी आपली बोलीभाषा आपल्या सहवासातून अर्जित होत असते मात्र ती होत असतांना त्याला नकळत ती अवगत होते. जाणीवपूर्वक ती शिकावी लागत नाही. तसेच जगभरातील साहित्यात कविता हा साहित्य प्रकार रुजलेला दिसतो. मराठी आणि भारतीय साहित्यातही कविता हा साहित्य प्रकार प्राचीन काळापासून रुजलेला आहे. त्याचे मूळ शोधल्यास ते आपल्याला पौराणिक-महाकाव्य इत्यादींच्या ग्रांथिक अवशेषात सापडतात. मात्र तिथेच शोधाचे मार्ग अडकवून संशोधनाचे मार्गाच खंडित झाल्याचे भास होऊन आपला पुढील शोध संपवतात. तरीही एक प्रयत्न केल्यास असे...

मास्तर. ...

मास्तर... मास्तर..... समजूनच नाही राह्यलं पेरलं तेवढंय नायी उगवत लेकी-बायकोचंत सोडाच पण दोन येळंचं कसं भागन मास्तर तुम्हीच सांगा प्रॉब्लेम कोठी असंन? सालं वर्षानुवर्ष संकरीत बियाने दगा देऊन रायले आंब्याच्या झाडाले कावूनसन्या फनसं येऊन रायले आन बाभळीच्या झाडाले देखने फुलं येऊन रायले बापाच्या हातानं वावर फुलारलं होतं बाप गेल्यावर भावानं विदेशी एंड्रेल फवारली तवापासुनस काळी माय वांझोटी झाली रातदिस मशागत करून बापानं धम्माची टॉनिक पाजली होती तवा कणसं टरारून वर येत होती  भावा-भावात हिशे-वाटणी झाल्यावर  सुपीक माह्य अन कोरडं ठाण त्याचं? कायबी कळत नाय या फरकाचं  रातच्याले माह्या पिकावर  सोडते चराले अमेरिकन सांड आन डुर्कावते दोन्ही पायात हिल्गवून आंड मास्तर आता तुम्हीच सांगा  कुठवर देऊ या वावरावर ध्यान का घेऊ दोऱ्यात अडकवून मान? तू एक कर..... रगारगात आंबेडकर पेर बघ कसं डौलदार पिक येईल मनूच्या भूमीला भडास दे ! बघ कसे क्षणार्धात ठीक होईल. - पद्माकर तामगाडगे 

बाप नावाचा माणूस

बाप नावाचा माणूस 'बाप' हा कोणत्या रसाचा संयोग आहे? आपण जाणताच 'उत्साह' त्याचा स्थायी आहे. सुखदुःखाची पिळदार वीण कधी सैल होऊ देत नाही कोसळणार्या दुःखाची आप्तांना झळ बसू देत नाही इवल्याशा पंखात आभाळ सामावणारा जागल्या आहे डोळ्यांत करुणा पण अश्रूंची त्याला मनाई आहे आपण जाणताच 'उत्साह' त्याचा स्थायी आहे. शृंगाराचा भूतकाळी डेटा रिसायकलबीन मध्ये आहे विभाव आलंबनाचा प्रत्यय घ्यायला फारंच रसविघ्ने आहे मंचावरचा रंग आता भयंकराच्या आवर्तात फिरतोय भावाचा संचार सदोदित भवतालात भीरभीरतोय रौद्राची ढाल अन् क्रोधाची तलवार हीच कमाई आहे आपण जाणताच 'उत्साह' त्याचा स्थायी आहे. बिभत्सतेचा स्वानुभव क्षणाक्षणाला झेलून घेतो अदभूताच्या विहंगतेला अंतरंगी रेलून देतो जुगुप्सा नाही, विस्मय नाही कष्टाने तो कातळ होतो असे नाही रे ! संसाराचा अवघा रस पातळ होतो? मिळून अवघ्या आठ रसाचा फक्त 'बाप'च स्थायी आहे आपण जाणताच 'उत्साह' त्याचा स्थायी आहे. 'बाप' नावाच्या सात्विकतेला अनुभावाचे वावडे आहे सानथोरांच्या हर्षक्षणांचे त्याच्यासाठी सोहळे आहे अं...

ग्लोबल जाळ्यात अडकलेला स्पायडरमॅन

ग्लोबल जाळ्यात अडकलेला स्पायडरमॅन खेड्याची वेस ओलांडून गाव ग्लोबल झालं संस्कृतीच्या रक्षकांनी भरली खाऊजाची बारुद मूलतत्तववादाच्या तोफेत आणि उडवला बार... झाला दाणाफान माणूस... मकडी का जाल हो; या हो इंटरनेट का जाळ्याचा धर्म सावज पकडणे... दोस्ता, या वेबदुनियेची दुनियादारी समजण्याची कप्यासीटी तुझ्या एज्युकेशनल डिग्रीत नाहीये..... नांगराचा फार, कासरा, धु-यावरचे हिरवे कुरण ऑनलाईन मागवता येत नाही... जमिनीला डबल डेकर करुन दुप्पट उत्पादन घेशीलही इथे आकाशाची चादर अन् जमिनीचा बिछाना सुटत नाही सोशलसाईट्स, ब्लॉग, वेबसाइट्स, ऑनलाईन मार्केटिंग डेबिट, क्रेडिट, अन् वानावानाचे कार्ड्स..... त्यात अडकून विव्हळणारा श्रमिक, मजूर, अन् जगाचा पोशिंदा शेतकरी.... आपली काय चूक? याचं डोकं फोडून केला विचार तरी उत्तर गवसत नाही.... कोळ्याचं जाळं, जाळयाचं महाजाळं कार्यकारणभावाचा जुळवता येत नाही भाव तेव्हा डोके फोडण्यापेक्षा ते लटकवलेले बरे म्हणून शांतीच्या मार्गाचे पाईक होतात... लाईफ, ईंसुरन्स, शासकीय आत्महत्येचे लाभार्थी कुटुंब मागे ठेऊन ...आता स्पायडर टपून आहे.... चूनचूनके मॅन गिळण्यासाठी...

तृतीयपंथीयांची अवहेलना का ?

तृतीयपंथीयांची अवहेलना का ? डॉ. पद्माकर तामगाडगे,             तृतीयपंथी, हिजडा, किन्नर, नपुंसक, षंढ असे नानाविध दुषणे लावून मानवी समाजातील एका संवेदनशील जीवाचे, माणसाचे माणूसपण हिरावून घेणे हे लाजिरवाणे नव्हे काय? जगात केवळ दोन लिंग अस्तित्वात आहे आणि ते म्हणजे स्त्री आणि पुरुष. तिसऱ्या लिंगाच्या माणसाने कुठे जायचे? त्याला जगण्याचा अधिकार नाही का ? वरील शब्द उच्चारताच हीन भाव उत्पन्न होतो. त्याचे कारण समाजाची मानसिकता हेच आहे. महाराष्ट्र शब्द कोशात दिलेल्या अर्थानुसार ‘हिजडा’ म्हणजे पुरुष वेषधारी नपुंसक, षंढ, निर्लज्ज- बीभत्स हावभाव, भाषण करणारा माणूस. किंवा निसत्व, दुबळा, पौरुष्यहीन माणूस, त्यातही पुष्टी जोडून काही हिजडे स्त्रीवेशात गावात दरसाल गरिबश्रीमान्तांकडून पैसे उकळतात त्यास वतनदार हिजडे म्हणतात. असे वर्णन येते. हे संपूर्ण हीनता व्यक्त करणारे व याच मानसिकतेतून तृतीयपंथीयांना हीन वर्तन करण्यास प्रवृत्त करणारी वागणूक हा समाज देतो. आज तृतीयापंथीयांच्या अशा बीभत्स स्थितीला समाजाची मानसिकताच जबाबदार आहे. कारण माणूस म...

स्मरण एका युद्धाचे : भारत-चीन १९६२

स्मरण एका युद्धाचे : भारत-चीन १९६२ - डॉ. पद्माकर तामगाडगे       भांडण घरातील असोत किंवा राष्ट्रांची संहार, विनाश, अशांती होणारच. भांडणामुळे आपला प्रतिस्पर्धी व आपण स्वत:ही सुखी होत नाही. त्यात दोघांचेही नुकसानच आहे. म्हणूनच जगाला भारतातून शांतीची शिकवण देणारा बुद्ध आज सर्व राष्ट्रांना हवाहवासा वाटतो. कारण शांतीचे साम्राज्य येईल तेव्हाच सुख, समृद्धी आणि विकास सुद्धा साधने शक्य होते. आपल्या जीवनाच्या ऐन उमेदीत रोहिणी नदीचा वाद गौतमाने मोठ्या चातुर्याने सोडविला तो मध्यममार्ग जगाला आजही तितकाच पोषक आहे. मात्र याचा अर्थ असा घेऊ नये की समस्येला घाबरून ही सोईस्कर पळवाट आहे. शांती हे तत्व बुद्धाने माणसांच्या हितासाठी, त्याच्या सर्व सुखासाठी सांगितलेला आहे. त्यात वैश्विकता आहे. प्रत्येक जीवाचं रक्षण आहे. जगण्यासाठी सोईस्कर असा धम्माचा तो मार्ग आहे. म्हणून विश्वशांतीचा प्रणेता बुद्ध महान आहे.           २० ऑक्टोबर १९६२   ला भारत-चीन युद्धाचा प्रारंभ झाला आणि सलग एक महिना ते सुरु राहिले. २० ऑक्टोबर २०१२ ल...

. . . येणाऱ्या सळसळत्या भविष्या

. . . येणाऱ्या सळसळत्या भविष्या -डॉ. पद्माकर तामगाडगे, ९८६९५८१६४७           जगाने कूस बदलली तो काळ आपणास सांगता येतो. १९६० नंतर हे जागतिक स्थित्यंतर प्रकर्षाने सर्व स्तरात जाणवायला लागले. भारतातील सर्वसामान्य माणसांपासून ते नवकोट नारायणांपर्यंत सगळ्याच वर्गीय पातळ्यांना कमी-अधिक प्रमाणात या झाला जाणवायला लागल्या होत्या. त्या तीक्ष्ण होऊन आता असह्य व्हायला लागल्या आहेत. म्हणून लोकांची जगभरातील ओरड प्रत्येकाच्या कानापर्यंत ऐकायला येत आहे. १९६० नंतर औद्योगिक क्रांतीबरोबरच ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात विकास पाऊन सर्वसामान्यांच्या दारात उभे राहिले. जगात आर्थिक महासत्ता होण्याच्या स्पर्धेत प्रत्येकच देश सहभागी होऊ लागला आणि वरकरणी नकार दिसणारा देशही प्रत्येक देशाला स्पर्धकच समजायला लागला. खाऊजा धोरण आले म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण आणि सातासमुद्रापल्याडच्या सीमा क्षणात जवळ आल्या हे विश्व आता ग्लोबलकूस झाले. आंतरराष्ट्रीय व्यापार-उद्दीम, विविध करार झाले. एकमेकांसाह्य करू अवघे धरू सुपंथ म्हणत हातात हात घा...