Skip to main content

कवितेचा जन्म?

कविता साहित्य प्रकार

 “Read not to contradict and confute, nor to believe and take for granted, nor to find talk and discourse, but to weigh and consider” -Francis Bacon (1561-1626)
“प्रतिवाद करण्यासाठी म्हणून किंवा खंडन करण्यासाठी म्हणून वाचन करू नका किंवा विश्वास ठेवण्यासाठी म्हणून किंवा गृहीत धरण्यासाठी म्हणून किंवा चर्चा करण्यासाठी किंवा विवेचानासाठी म्हणून देखील वाचन करू नका. तर वाचन करा समर्थ होण्यासाठी म्हणून, स्वतंत्रपणे विचार करण्यासाठी म्हणून.”
-फ्रान्सिस बेकन(१५६१-१६२६)

माणसाला जशी आपली बोलीभाषा आपल्या सहवासातून अर्जित होत असते मात्र ती होत असतांना त्याला नकळत ती अवगत होते. जाणीवपूर्वक ती शिकावी लागत नाही. तसेच जगभरातील साहित्यात कविता हा साहित्य प्रकार रुजलेला दिसतो. मराठी आणि भारतीय साहित्यातही कविता हा साहित्य प्रकार प्राचीन काळापासून रुजलेला आहे. त्याचे मूळ शोधल्यास ते आपल्याला पौराणिक-महाकाव्य इत्यादींच्या ग्रांथिक अवशेषात सापडतात. मात्र तिथेच शोधाचे मार्ग अडकवून संशोधनाचे मार्गाच खंडित झाल्याचे भास होऊन आपला पुढील शोध संपवतात. तरीही एक प्रयत्न केल्यास असे दिसते की या महाकाव्यातील श्लोकात आलेल्या कारीकेच्या अनुषंगाने शोध घेतल्यास कवितेचे मूळ शोधण्याचा नव्याने प्रयत्न होऊ शकतो.
कविता आणि समीक्षा यांचा शोध घेतांना या पृथ्वीतलावरील पहिली कविता व त्या कवितेची पहिली समीक्षा कोणती? याचा शोध घेतल्यास सदर आख्यायिका सांगितली जाते. ती अशी,
“वाल्मिकी ऋषी भारद्वाज नावाच्या शिष्यासह तमसा नदीकाठी स्नानसंध्येस योग्य जागा शोधात होते. त्या वेळी त्यांना एका झाडावर एक कामासक्त आणि मैथुनमग्न असे क्रौंच पक्ष्याचे जोडपे दिसले. तेवढ्यात जवळपास उभ्या असलेल्या एका निषादाने बाण मारून त्या जोडप्यापैकी नराचा अकारण वध केला. बाणाने जखमी झालेल्या आणि वेदनांनी तडफडणाऱ्या प्रियकराला पाहून त्याची पक्षीण प्रेयसी करून स्वरात विलाप करू लागली. वाल्मिकींना ते दृश्य पाहून अतिशय करुणा वाटली आणि त्यांच्या मुखातून सहजस्फूर्त उद्गार बाहेर पडले : ‘हे निषादा, ज्या अर्थी क्रौंच जोडप्यापैकी काममोहित झालेल्या एका निरपराध पक्ष्याचा तू अकारण वध केला आहेस त्या अर्थी तुला (ह्या जगात) कधीही प्रतिष्ठा मिळणार नाही.’
मा नषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वती समाः |
यत्क्रौंचमिथुनादेकमधी: काममोहितम् ||

पण हे सहजस्फूर्त उद्गार नेहमीच्या पद्धतीने उच्चारले गेले नव्हते; ते होते छंदोबद्ध आणि म्हणूनच अभिनव. कवितेचा तो पृथ्वीवरील जन्म होता. देवांनी तत्काळ पुष्पवृष्टी करून अनुष्टुभ वृत्तातील कवितेचा जन्म साजरा केला, तर साक्षात ब्रह्मदेवांनी त्यामागे आपली प्रेरणा आहे हे वाल्मिकींना सांगून कवितेला आशीर्वाद दिला. पण आपल्या उद्गाराच्या अभिनव अशा छंदोबद्धतेने आश्चर्यचकित झालेल्या वाल्मिकींनी प्रश्न केला, “मी जे उच्चारले ते काय आहे?” (किम् इदम् व्याहर्तम मया|)
अशाप्रकारे वाल्मिकींच्या छंदोबद्ध उद्गाराने कवितेचा आणि ‘किम इदम्’ ह्या प्रश्नाने समीक्षेचा जन्म झाला आणि तोही लगेचच. असे सांगितले जाते. या पुढे जाऊन असे लक्षात येते की

“यावज्जीवेत् सुखं जीवेत, नास्ति मृत्युरगोचरः |
भस्मी भूतस्य देहस्य पुनरागमनं कृतः|”

हा चार्वाकांचा श्लोक काय कविता नाही काय? तर कविताच आहे आणि तीही वाल्मिक ऋषींच्या आधीची आहे. ती अशी की, नवव्या शतकाच्या अखेरीस झालेल्या जयंत भट्ट या नैयायिकाच्या ‘न्यायमंजिरी’त हा पूर्ण श्लोक आला आहे. नंतर मात्र या श्लोकाला प्रक्षिप्त करून चौदाव्या शतकातील माधव विद्यारण्य या वेदांत्याने ‘नास्ति मृत्युरगोचरः’ हा श्लोकार्ध गाळून ‘ऋण कृत्वा धृत पिबेत’ हे बदनाम वचन घुसविले. मात्र हा श्लोक छंदोबद्ध कविताच आहे. चार्वाकाचा उल्लेख महाभारतात येतो याचा अर्थ महाकाव्य लिहिण्याआधी चार्वाकाचे साहित्य उपलब्ध होते. ते जनमनात आधीच पोहचले होते. याचाच अर्थ वरील “मा नाषाद....” या पहिल्या कवितेच्या आधीही कविता सापडते आणि हा मान चार्वाकाला जातो. मग आद्य कवी चार्वाकच असे म्हणता येईल.
भारतीय तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक देवीप्रसाद चटोपाध्याय यांच्या ‘लोकायत’ या ग्रंथात आणि इतरत्र दर्शन शास्त्राच्या अभ्यासकांनी जो निष्कर्ष मांडला आहे तो वेदाचा आरंभ ऋगवेद होय आणि इ. स. च्या पंधराशे वर्ष आधीचा कालखंड सांगितला जातो. ज्या गीतेवर शंकराचार्यांनी भाष्य लिहिले ‘शांकरभाष्य’ ते इ.स. च्या ९ व्या शतकात लिहिले. त्या आधी ८०० किंवा ९०० शे वर्ष आधी खुद्द श्रीकृष्णाने गीता सांगितली असे सांगितले जाते. याचाच अर्थ महाभारताचा कालखंड हा इ.स. पूर्व ८ वे किंवा ९ वे शतक सांगितले जाते. महाभारतात चार्वाकाला भर सभेत जिवंत जळल्याचा व त्याच्या लोकायत दर्शनाचा उल्लेख येतो म्हणजे महाभारताच्या आधी चार्वाकाचा कालखंड गृहीत धरता येतो. म्हणजेच वेदाच्या प्रारंभीच चार्वाकाने समाजातील विषमव्यवस्थेला कडाडून विरोध केला. हे उघड आहे.  गीतेचे सूत्रबद्धरूप पहिल्यांदा लिहिले गेले ते बादरायणी यांच्या ‘ब्रह्मसूत्र’ ग्रंथाच्या रूपाने तो इ. स. च्या पहिल्या शतकात.
या सगळ्या संदर्भावरून असे लक्षात येते की आद्य कविता कोणती? तर, चार्वाकाच्या लोकायत दर्शनशास्त्रातील श्लोक ही छंदोबद्ध रचनाच आद्य काव्य ठरते. आणि वरील भारतीय साहित्येतीहासात आद्य काव्याचे प्रमाण सांगितले जाते ते याकालानुक्रमाच्या पुराव्यावरून फोल ठरते. यानंतरही अनेक बुद्ध वचने मौखिक रूपाने जनमनात पसरलेली होती ती ‘उदान’ म्हणून प्रसिद्ध आहे ही पाली भाषेतील कवनेच आहे. त्यातून बुद्ध तत्त्वज्ञान ओतप्रोत भरलेले आहे जे अखिल मानवांसाठी आज आणि उद्याही अत्यावश्यक आहे. मानवाच्या कल्याणासाठी एकमेव आहे.
(संदर्भ :- भारतीय तत्त्वज्ञान- एस. जी. सरदेसाई)

“आगही दामे-शुनीदिन जिस कदर चाहे बिछाए,
मुद्दआ अन्का है अपने आलमें-तकरीर का |”
(तू आपल्या जाणिवेचे जाळे वाटेल तेवढे पसरव तरी पण माझ्या म्हणण्याचा मथितार्थ एका चिमणीप्रमाणे आहे. तुझ्या जाळ्यात ती फसणार नाही.)

Comments

Popular posts from this blog

तृतीयपंथीयांची अवहेलना का ?

तृतीयपंथीयांची अवहेलना का ? डॉ. पद्माकर तामगाडगे,             तृतीयपंथी, हिजडा, किन्नर, नपुंसक, षंढ असे नानाविध दुषणे लावून मानवी समाजातील एका संवेदनशील जीवाचे, माणसाचे माणूसपण हिरावून घेणे हे लाजिरवाणे नव्हे काय? जगात केवळ दोन लिंग अस्तित्वात आहे आणि ते म्हणजे स्त्री आणि पुरुष. तिसऱ्या लिंगाच्या माणसाने कुठे जायचे? त्याला जगण्याचा अधिकार नाही का ? वरील शब्द उच्चारताच हीन भाव उत्पन्न होतो. त्याचे कारण समाजाची मानसिकता हेच आहे. महाराष्ट्र शब्द कोशात दिलेल्या अर्थानुसार ‘हिजडा’ म्हणजे पुरुष वेषधारी नपुंसक, षंढ, निर्लज्ज- बीभत्स हावभाव, भाषण करणारा माणूस. किंवा निसत्व, दुबळा, पौरुष्यहीन माणूस, त्यातही पुष्टी जोडून काही हिजडे स्त्रीवेशात गावात दरसाल गरिबश्रीमान्तांकडून पैसे उकळतात त्यास वतनदार हिजडे म्हणतात. असे वर्णन येते. हे संपूर्ण हीनता व्यक्त करणारे व याच मानसिकतेतून तृतीयपंथीयांना हीन वर्तन करण्यास प्रवृत्त करणारी वागणूक हा समाज देतो. आज तृतीयापंथीयांच्या अशा बीभत्स स्थितीला समाजाची मानसिकताच जबाबदार आहे. कारण माणूस म...

अचल चेतनागृह : राजगृह -डॉ. पद्माकर तामगाडगे

अचल चेतनागृह : “राजगृह” “Education is not preparation for life: education is life itself.” John Dewey डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचा आयुष्यपट पहिला तरी जगातील प्रत्येक माणूस दिपून जातो असा लख्ख जीवन प्रवास जगातील अपवादात्मक विभूतीचाच असेल! किंबहुना फक्त डॉ. बाबासाहेबांचाच असेल... आयुष्यातील एकेक घटना आणि त्या घटना-प्रसंगांना येणारे अवघड वळण, आयुष्याच्या पावलोपावली येणारा नित्य संघर्ष. अस्पृश्यतेच्या सावटाखाली जगतांना येणाऱ्या अपमानाची झळ सोसत सर्वोच्च स्थानी पोहोचण्याचे परम ध्येय. उजेड मागत फिरणाऱ्या कफल्लक पिढ्यांना त्यांच्या झोळ्या लख्ख प्रकाशाने भरून काळोखाला प्रकाशमान करणारा हा महासूर्य. एकाच आयुष्यात अलौकिक म्हणावे, जादुई म्हणावे असे कार्य या महामानवाच्या हयातीत त्यांनी केले आहे. त्यांच्या उत्तुंग कार्याचा, व्यक्तिमत्वाचा वेध शब्दात पकडता येईल असा शब्दच कोणत्या भाषेत उपलब्ध नाही. अशाच एका पैलूचा या निमित्ताने धांडोळा या लेखाच्या निमित्ताने घेणार आहोत. महामानव डॉ. बाबासाहेबांचे एकूण आयुष्य पहिले तर प्रत्येक गोष्टीसाठी धडपड आहे. कोणतीच गोष्ट त्यांना सहजासहजी प्राप्त झाली नाह...

ब्रेस्ट टॅक्स आणि नांगेली

*"Breast Taxes and Nangali via Sunny Leone"* singing the praise of our Prosperous culture to telling the pride of our traditions our throat does not dry up. And we never stoop. From our maternal culture to the advertising hub take a snap oh good man! Where was the Left's strong woman empire,  and as well there are also the devotees of Sunny Leone. There is worship of mother-goddess.  And at the same they are sucking  the mother honour at every square.  And Empire of Travancore drew up the Breast tax in the name of Mulkkram. And in the history of Kerala Nangeli go to closed one practice permanently the breast will not keep open and Taxes will not be taxed On the basis of breast size. She Cut the breast and keeping into banana leaf. She maintains the honors of feminism.  Kicking out on the orthodox end. Leone ,do you get some insight? You, you are the Google Search of the Year. and Best Porn star as well. Your brewing business reached to the top. Ungrateful histor...