Skip to main content

Posts

Showing posts from 2011

भीमा कोरेगावचा विजयस्तंभ

विजयस्तंभ गर्भगळीत करतील गनिमा शूर असा सरदार संकट समयी आहे त्याची सज्ज अशी तलवार भीती त्याला नाही कुणाची बाणा लढवय्या समर भूमीला वंदन त्याचे सदा असे तय्यार अफाट छाती शूर मर्दाची मिशा तशा भरदार बांधून तो चालला कटीवर तीक्ष्ण अशी तलवार पेशवाईची फुगा फोडला मोठ्या चतुराईने सहस्त्रावधी वेशाव्यांचा केला कुलसंहार एकाशी शंभराची लढती तीन दिवसाचे भुके जागती हजार सैन्य पेशवाईचे तरी गनीम झाले ठार विजयाचा हा स्तंभच देईल स्फूर्तीचे नवगान भीमा कोरेगावचा आम्हा सदा असे अभिमान -"ग्लासनोस्त" या काव्य संग्रहातून. . . .

माझी अनवट वाट. . .

माझी अनवट वाट . . . - डॉ . पद्माकर तामगाडगे , मुंबई " खेळलो खेळ असा की मी इथे दमलोच नाही मी इथे आलो कसा हे मला कळलेच नाही ."        आजचा वर्तमान , या क्षणाला मुठीत घेऊन लिहितो तो क्षण , मी ज्या पथावर आहे ; त्या यशस्वी क्षणाचा साक्षीदार हा  माझा भूतकाळ आहे हे मला विसरून चालणार नाही . मी आज आयुष्याच्या यशस्वी वळणावर आहे आणखी खूप करायचे आहे . आयुष्य इतकं छोट आहे की आयुष्याच्या उत्तरार्धातही अनेक गोष्टी करायच्या राहून जातात . आपण अतिशय ग्रामीण क्षेत्रातून , सोयी - सुविधांच्या अभावातून, स्वत ; चा मार्ग क्रमीत वाटचाल करीत असतो आणि या तुटपुंज्या साधन - सामुग्रीच्या सहाय्याने जो इच्छित धेय्य गाठतो तोच खरा यशवंत . माझा वर्तमान शिक्षणाने प्रकाशित केला . आज शिक्षणातील सर्वोच पदवी पीएच . डी . मिळवून ख - या अर्थाने राष्ट्रीय मुख्य प्रवाहात आलो आहे . जागतिक शैक्षणिक संदर्भातील ' पीपल्स एजुकेशन सोसायटी ' च्या भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या ' सिद्धार्थ महाविद...