माझी अनवट वाट . . . - डॉ . पद्माकर तामगाडगे , मुंबई " खेळलो खेळ असा की मी इथे दमलोच नाही मी इथे आलो कसा हे मला कळलेच नाही ." आजचा वर्तमान , या क्षणाला मुठीत घेऊन लिहितो तो क्षण , मी ज्या पथावर आहे ; त्या यशस्वी क्षणाचा साक्षीदार हा माझा भूतकाळ आहे हे मला विसरून चालणार नाही . मी आज आयुष्याच्या यशस्वी वळणावर आहे आणखी खूप करायचे आहे . आयुष्य इतकं छोट आहे की आयुष्याच्या उत्तरार्धातही अनेक गोष्टी करायच्या राहून जातात . आपण अतिशय ग्रामीण क्षेत्रातून , सोयी - सुविधांच्या अभावातून, स्वत ; चा मार्ग क्रमीत वाटचाल करीत असतो आणि या तुटपुंज्या साधन - सामुग्रीच्या सहाय्याने जो इच्छित धेय्य गाठतो तोच खरा यशवंत . माझा वर्तमान शिक्षणाने प्रकाशित केला . आज शिक्षणातील सर्वोच पदवी पीएच . डी . मिळवून ख - या अर्थाने राष्ट्रीय मुख्य प्रवाहात आलो आहे . जागतिक शैक्षणिक संदर्भातील ' पीपल्स एजुकेशन सोसायटी ' च्या भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या ' सिद्धार्थ महाविद...