Skip to main content

Posts

Showing posts from 2012

तृतीयपंथीयांची अवहेलना का ?

तृतीयपंथीयांची अवहेलना का ? डॉ. पद्माकर तामगाडगे,             तृतीयपंथी, हिजडा, किन्नर, नपुंसक, षंढ असे नानाविध दुषणे लावून मानवी समाजातील एका संवेदनशील जीवाचे, माणसाचे माणूसपण हिरावून घेणे हे लाजिरवाणे नव्हे काय? जगात केवळ दोन लिंग अस्तित्वात आहे आणि ते म्हणजे स्त्री आणि पुरुष. तिसऱ्या लिंगाच्या माणसाने कुठे जायचे? त्याला जगण्याचा अधिकार नाही का ? वरील शब्द उच्चारताच हीन भाव उत्पन्न होतो. त्याचे कारण समाजाची मानसिकता हेच आहे. महाराष्ट्र शब्द कोशात दिलेल्या अर्थानुसार ‘हिजडा’ म्हणजे पुरुष वेषधारी नपुंसक, षंढ, निर्लज्ज- बीभत्स हावभाव, भाषण करणारा माणूस. किंवा निसत्व, दुबळा, पौरुष्यहीन माणूस, त्यातही पुष्टी जोडून काही हिजडे स्त्रीवेशात गावात दरसाल गरिबश्रीमान्तांकडून पैसे उकळतात त्यास वतनदार हिजडे म्हणतात. असे वर्णन येते. हे संपूर्ण हीनता व्यक्त करणारे व याच मानसिकतेतून तृतीयपंथीयांना हीन वर्तन करण्यास प्रवृत्त करणारी वागणूक हा समाज देतो. आज तृतीयापंथीयांच्या अशा बीभत्स स्थितीला समाजाची मानसिकताच जबाबदार आहे. कारण माणूस म...

स्मरण एका युद्धाचे : भारत-चीन १९६२

स्मरण एका युद्धाचे : भारत-चीन १९६२ - डॉ. पद्माकर तामगाडगे       भांडण घरातील असोत किंवा राष्ट्रांची संहार, विनाश, अशांती होणारच. भांडणामुळे आपला प्रतिस्पर्धी व आपण स्वत:ही सुखी होत नाही. त्यात दोघांचेही नुकसानच आहे. म्हणूनच जगाला भारतातून शांतीची शिकवण देणारा बुद्ध आज सर्व राष्ट्रांना हवाहवासा वाटतो. कारण शांतीचे साम्राज्य येईल तेव्हाच सुख, समृद्धी आणि विकास सुद्धा साधने शक्य होते. आपल्या जीवनाच्या ऐन उमेदीत रोहिणी नदीचा वाद गौतमाने मोठ्या चातुर्याने सोडविला तो मध्यममार्ग जगाला आजही तितकाच पोषक आहे. मात्र याचा अर्थ असा घेऊ नये की समस्येला घाबरून ही सोईस्कर पळवाट आहे. शांती हे तत्व बुद्धाने माणसांच्या हितासाठी, त्याच्या सर्व सुखासाठी सांगितलेला आहे. त्यात वैश्विकता आहे. प्रत्येक जीवाचं रक्षण आहे. जगण्यासाठी सोईस्कर असा धम्माचा तो मार्ग आहे. म्हणून विश्वशांतीचा प्रणेता बुद्ध महान आहे.           २० ऑक्टोबर १९६२   ला भारत-चीन युद्धाचा प्रारंभ झाला आणि सलग एक महिना ते सुरु राहिले. २० ऑक्टोबर २०१२ ल...

. . . येणाऱ्या सळसळत्या भविष्या

. . . येणाऱ्या सळसळत्या भविष्या -डॉ. पद्माकर तामगाडगे, ९८६९५८१६४७           जगाने कूस बदलली तो काळ आपणास सांगता येतो. १९६० नंतर हे जागतिक स्थित्यंतर प्रकर्षाने सर्व स्तरात जाणवायला लागले. भारतातील सर्वसामान्य माणसांपासून ते नवकोट नारायणांपर्यंत सगळ्याच वर्गीय पातळ्यांना कमी-अधिक प्रमाणात या झाला जाणवायला लागल्या होत्या. त्या तीक्ष्ण होऊन आता असह्य व्हायला लागल्या आहेत. म्हणून लोकांची जगभरातील ओरड प्रत्येकाच्या कानापर्यंत ऐकायला येत आहे. १९६० नंतर औद्योगिक क्रांतीबरोबरच ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात विकास पाऊन सर्वसामान्यांच्या दारात उभे राहिले. जगात आर्थिक महासत्ता होण्याच्या स्पर्धेत प्रत्येकच देश सहभागी होऊ लागला आणि वरकरणी नकार दिसणारा देशही प्रत्येक देशाला स्पर्धकच समजायला लागला. खाऊजा धोरण आले म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण आणि सातासमुद्रापल्याडच्या सीमा क्षणात जवळ आल्या हे विश्व आता ग्लोबलकूस झाले. आंतरराष्ट्रीय व्यापार-उद्दीम, विविध करार झाले. एकमेकांसाह्य करू अवघे धरू सुपंथ म्हणत हातात हात घा...

हिमालया माफ कर !

               हिमालया माफ कर ! हिमालया, तू इतका मोठा ? साऱ्या पर्वतांना लाजविणारा इतिहासाची साक्ष ठेऊन; कित्त्येक शतकं गाजविणारा. तुझ्या हिमतीचीही द्यावी दाद. जगाचा अनभिषिक्त सम्राट सूर्य त्यालाही थोपवून धरलंस तू आणि आजही हे अजिंक्यपद तुलाच? हिमालया, तू नाहीस नुसत्या माती-गोटयाचा तू नाहीस केवळ उत्तुंग एकसंघ पाषाणाचा तू नेसलेली हिमवस्त्र उगीचच नाहीत, तू नाहीसच केवळ अचेतनाचा पुतळा, तू आहेस सर्जनतेचा महामेरू, तू प्रसविल्यास अनेक हिमनद्या, तुझ्या आज्ञेने थोपवून धरले उद्दाम मेघ, आणि तुझ्याच अंशातून जन्मल्या अनेक गंगा तू शांतीचा विजिगीषू स्तूप आहे. तू सहनशीलतेचा कळस आहे. असंख्य तुफान, वादळवारे तुला थरकापले, तरी तू तसाच अविचल आहेस. हिमालया, तू इतिहासाचा खरा साक्षी तुझ्याच देखत म्लेंच्छ इथे आले तुझ्या परोक्ष पानिपत घडले तू पाहिलेस अनेक रणसंग्राम तुझ्याच नजरेदेखत घडला इतिहास. तू पाहिली आहेस देशाची फाळणी जातीजातीत धर्माधर्माची महापातके आणि इथेच विश्वशांतीचा प्...