Skip to main content

Posts

अचल चेतनागृह : राजगृह -डॉ. पद्माकर तामगाडगे

अचल चेतनागृह : “राजगृह” “Education is not preparation for life: education is life itself.” John Dewey डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचा आयुष्यपट पहिला तरी जगातील प्रत्येक माणूस दिपून जातो असा लख्ख जीवन प्रवास जगातील अपवादात्मक विभूतीचाच असेल! किंबहुना फक्त डॉ. बाबासाहेबांचाच असेल... आयुष्यातील एकेक घटना आणि त्या घटना-प्रसंगांना येणारे अवघड वळण, आयुष्याच्या पावलोपावली येणारा नित्य संघर्ष. अस्पृश्यतेच्या सावटाखाली जगतांना येणाऱ्या अपमानाची झळ सोसत सर्वोच्च स्थानी पोहोचण्याचे परम ध्येय. उजेड मागत फिरणाऱ्या कफल्लक पिढ्यांना त्यांच्या झोळ्या लख्ख प्रकाशाने भरून काळोखाला प्रकाशमान करणारा हा महासूर्य. एकाच आयुष्यात अलौकिक म्हणावे, जादुई म्हणावे असे कार्य या महामानवाच्या हयातीत त्यांनी केले आहे. त्यांच्या उत्तुंग कार्याचा, व्यक्तिमत्वाचा वेध शब्दात पकडता येईल असा शब्दच कोणत्या भाषेत उपलब्ध नाही. अशाच एका पैलूचा या निमित्ताने धांडोळा या लेखाच्या निमित्ताने घेणार आहोत. महामानव डॉ. बाबासाहेबांचे एकूण आयुष्य पहिले तर प्रत्येक गोष्टीसाठी धडपड आहे. कोणतीच गोष्ट त्यांना सहजासहजी प्राप्त झाली नाह...
Recent posts

बाबासाहेब तुम्ही गेल्यापासून...

  बाबासाहेब तुम्ही गेल्यापासून... बाबासाहेब तुम्ही गेल्यापासून... आम्ही तिथेच आहोत...  राजगृहाच्या पायरीवर... ढळू दिला नाही कोपराही आमंत्रणे भिरकावून बसलो 'हिंदू'  कॉलनीच्या गस्तीवर... बाबासाहेब तुम्ही गेल्यापासून... आम्ही तिथेच आहोत... हिंदू कोड बिलाच्या पानावर... शब्दही जीर्ण होऊ दिला नाही सुधारणा त्यांनी केल्या असतील... मात्र, पाठांतर आमच्या वस्तीवर बाबासाहेब तुम्ही गेल्यापासून... आम्ही तिथेच आहोत... २६, अलीपुर रोडवर... 'आम्ही भारताचे लोक' होऊन संविधानाचे रक्षक होऊन अष्टोप्रहर संसदेच्या दारावर बाबासाहेब तुम्ही गेल्यापासून... आम्ही तिथेच आहोत... लंडनच्या स्मृतीतील स्थळावर... आमूलाग्र असेल बदलले जग कवेलूही बदलू दिला नाही असा दबदबा निर्माण केला जगावर बाबासाहेब तुम्ही गेल्यापासून... आम्ही तिथेच आहोत... नागपूरच्या 'दीक्षाभूमीवर'... बावीस प्रतिज्ञांचे धडे घेत दरेकाने दरेकाला दीक्षा देत लक्ष्य बौद्धमय भारतावर बाबासाहेब तुम्ही गेल्यापासून... आम्ही तिथेच आहोत... आम्ही तिथेच आहोत... आम्ही हललोच नाही... १९५६ पासून... - पद्माकर तामगाडगे

ब्रेस्ट टॅक्स आणि नांगेली

*"Breast Taxes and Nangali via Sunny Leone"* singing the praise of our Prosperous culture to telling the pride of our traditions our throat does not dry up. And we never stoop. From our maternal culture to the advertising hub take a snap oh good man! Where was the Left's strong woman empire,  and as well there are also the devotees of Sunny Leone. There is worship of mother-goddess.  And at the same they are sucking  the mother honour at every square.  And Empire of Travancore drew up the Breast tax in the name of Mulkkram. And in the history of Kerala Nangeli go to closed one practice permanently the breast will not keep open and Taxes will not be taxed On the basis of breast size. She Cut the breast and keeping into banana leaf. She maintains the honors of feminism.  Kicking out on the orthodox end. Leone ,do you get some insight? You, you are the Google Search of the Year. and Best Porn star as well. Your brewing business reached to the top. Ungrateful histor...

सदिच्छा. ..

*सदिच्छा* ... सद्या वेद, अथर्व,  पार्थ वगैरे वगैरे. ... मेडिकल,  इंजिनिअरिंग वगैरे वगैरे ची यशस्वी तयारी करतात. सम्यक, प्रशीक,  दीक्षा,  प्रज्ञा वगैरे वगैरे एमपीएससी, युपीएससी, जेआरई वगैरे वगैरे ची बाजी मारतात. संभा, गण्या, शिवा, वगैरे वगैरे पोरं सार्वजनिक उत्सवांची, सभां वगैरे वगैरे जीव लावून जय्यत तयारी करतात. सर्वाना यशाच्या अगणित सदिच्छा.... - पद्माकर तामगाडगे

माणसा तुझ्या कोणत्या दिशा तुला बाध्य आहे?

माणसा तुझ्या कोणत्या दिशा तुला बाध्य आहे? माणसा तुझ्या कोणत्या दिशा तुला बाध्य आहे? तुझ्या मुक्त विहंगला जात-भाषा-प्रांतांचे कसले कडे आहे? कोलंबसाला चहूदिशांनी विचारले? सागराच्या लाटांनी फटकारले? आशिया खंडाच्या दाराशी येऊन, त्याने कोणत्या भाषेत सुसंवाद केला? अमेरिगो व्हेस्पुसीने भारतीय खलाशाला, आधी जात-धर्म-भाषा विचारली असेल का? वास्को-द-गामा तू जवळ होता, खऱ्या जम्बुद्विपाच्या तू आलास पण तुला भारत सापडला नाही. युरोप ते भारत फक्त प्रवास झाला. इथे इसवीसनापूर्वीच भूमंडलीकरण अवगत होते माणसांच्या माणूसपणाचे सर्वत्र बिगूल वाजत होते. चार्वाक, बुद्ध नावाचे दार्शनिक भूमीच्या कणाकणात तेवत होते वैश्विक माणूस घडविण्याचा तत्त्वांश याच भूमीत रुजला कोलंबसा-व्हेस्पुसी-वास्को तुमचे ध्येय व्यापाराचे तुमच्या हेतूंना स्वार्थाची किनार साधनाला निर्धन आणि निर्धनांची शोषण शृंखला जहाजात टाकून इथे कशाला आणलीस... उत्तरेतील गोचीड आधीच पोट फुगवून तडकताहेत चले जाव!... चले जाव !!... असे आमच्या श्रमण संस्कृतीत बसत नाही नाहीतर केव्हाच पृथ्वी पादाक्रांत के...

We The People of India ...

आम्ही भारताचे लोक.... भडक माथी कडक केली परजलेल्या पोलादासारखी धर्मनांगीचे विष ओतून पोलादाला तडक दिली. आता पोलाद तुटेल किंवा शिर कटेल पानापानतले मुलतत्त्वे वाचून एकेक  ...

एक स्त्रीवादी कवयित्री

एक स्त्रीवादी कवयित्री लिहिते पुरुषी व्यवस्थेविरुद्ध, बंडखोर, विद्रोही काव्य. मिळवते शाल-श्रीफळ आणि बक्कळ रकमेचा पुरस्कार, सात जन्माचा पती करतो त्याचा स्वीकार... - पद्म...