Skip to main content

माझी अनवट वाट. . .

माझी अनवट वाट. . .
- डॉ. पद्माकर तामगाडगे, मुंबई
"खेळलो खेळ असा की मी इथे दमलोच नाही
मी इथे आलो कसा हे मला कळलेच नाही."

      आजचा वर्तमान, या क्षणाला मुठीत घेऊन लिहितो तो क्षण, मी ज्या पथावर आहे ; त्या यशस्वी क्षणाचा साक्षीदार हा  माझा भूतकाळ आहे हे मला विसरून चालणार नाही. मी आज आयुष्याच्या यशस्वी वळणावर आहे आणखी खूप करायचे आहे. आयुष्य इतकं छोट आहे की आयुष्याच्या उत्तरार्धातही अनेक गोष्टी करायच्या राहून जातात. आपण अतिशय ग्रामीण क्षेत्रातून, सोयी-सुविधांच्या अभावातून, स्वत;चा मार्ग क्रमीत वाटचाल करीत असतो आणि या तुटपुंज्या साधन-सामुग्रीच्या सहाय्याने जो इच्छित धेय्य गाठतो तोच खरा यशवंत. माझा वर्तमान शिक्षणाने प्रकाशित केला. आज शिक्षणातील सर्वोच पदवी पीएच. डी. मिळवून -या अर्थाने राष्ट्रीय मुख्य प्रवाहात आलो आहे. जागतिक शैक्षणिक संदर्भातील 'पीपल्स एजुकेशन सोसायटी' च्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 'सिद्धार्थ महाविद्यालयात' मराठी विभाग प्रमुख म्हणून गेली सहा वर्ष कार्यरत आहे. की ज्या स्थानी मोठ मोठी साहित्यिक नावाजलेल्या व्यक्ती कार्यरत होत्या. त्यात अनंत काणेकर, सचिन तेंडुलकरांचे वडील रमेश तेंडूलकर ही जबाबदारी मला मिळाली त्याचे सिंहावलोकन करून मागे पाहणे माझ्या इथपर्यंतच्या प्रवासाचे अमूल्य क्षण स्मरण करणे या प्रसंगी उचितच ठरेल आणि माझ्या मागच्या येणा-या काफिल्याला ते मार्गदर्शक ठरावे हाच माझा नम्र हेतू आहे.
शिक्षणाच्या व्याख्या अनेकांनी केल्या; अब्राहम लिंकन यांचे पत्र अनेकांना प्रेरणादायी ठरते. मात्र साध:स्थितीत शिक्षण म्हणजे नौकरी हे समीकरण झाले आहे. शिक्षणाचा हेतू महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काय होता? "शिक्षण म्हणजे नैतिक मूल्यांची शिकवण", "Development of  character  or  mental  power " एका आदर्श व्यक्तिमत्वाची जडण-घडण ज्या शिक्षणातून मिळते ते खरे शिक्षण. भारताला एक संस्कृती आहे त्या संस्कृतीने जगातील शिक्षणाचे संदर्भ दिले आहे. युरोप असो अथेन्स असो. आज ज्यांची तत्वज्ञ म्हणून नाव घेतो त्यांनी भारतातील 'नालंदा', 'तक्षशीला' या विद्यापीठातून  नवे तात्विक मूल्य आत्मसात केले आहे.. च्या त्या व्या शतकात जगातील अनेक विद्वान भारतात उच्च शिक्षणासाठी या विद्यापीठात वास्तव्याला असायचे. आज मात्र परिस्थिती उलट झालेली आहे. आज आपणच उच्च शिक्षणासाठी बाहेरच्या देश्यांमध्ये शिकायला जातो. विदेशात जाऊन उच्च शिक्षण घेणे वाईट आहे असे मला मुळीच म्हणायचे नाही.  मात्र आपल्या जवळचे स्वत: विसरून जातो आणि मृगजळाच्या मागे धावत राहतो हे स्वत:ला फसविणे आहे.  सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे आहे त्याचे ज्ञान आत्मसात करणे गरजचे आहे. म्हणून स्वसामार्थ्याने जे परिस्थितीला काबूत ठेवून त्यावर मात करायला शिकतो तो यशस्वी होतो नियतीला शरण जाणारा पराभूत होतो. मात्र नियतीला आपल्या मनगटाच्या बळावर वाकवून आपल्या इच्छितापर्यंत जो पोहचतो तोच  आयुष्याच्या यशोशिखरावर पोहचतो. ओदान्त्पुरा, नालंदा, विक्रमशीला, जगताला, तक्षशीला हे  भारतातील विध्यापीठे आंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्रे होती.  १२ व्या शतकाच्या उत्तरार्धात नालंदा विहारात विशाल ग्रंथालय होते. ताळपत्रे   भोजपत्रे वापरून हे ग्रंठ्लाय सिद्ध केले होते. सुलतानी आक्रमणात लाख ग्रंथ महिने जळत राहिले. यावरून तत्कालीन ग्रंथ समृद्धी   विशालता लक्षात येईल. आधुनिक  काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबई येथील निवास स्थानी 'राजगृह' २२ हजार तर दिल्लीला १५ हजार ग्रंथ होते. हे सांगायचे तात्पर्य एवढेच की भारताला प्राचीन काळापासून ते वर्तमान, समकाल पर्यंत ज्ञानाची मोठी परंपरा आहे. ग्रंथाशी मैत्री केली की खरे-खोटे, नैतिक-अनैतिक कोणते हे ठरविण्याचे चक्षु मिळतात म्हणून वाचन हेच सर्व दु:खाचे निरुपण ठरणारे आहे.
उद्याचे भवितव्य तरुणांच्या हाती आहे. आणि आज ग्लोबलायझेशन, खाजगीकरणामुळे ग्रामीण भारत कोलमडून पडत आहे. सध्याचे वर्तमान प्रश्न वेगळे आहे. त्यावर उपायही शोधणे या पिढीचे कर्तव्य आहे. त्यासाठी आधी ते समजून घेणे गरजचे आहे. वर्तमानाशी सांधेजोड जो करणार नाही तो त्या पिढीचा शत्रू ठरतो. म्हणूनच जात, धर्म, स्थळ-कालातीत विचारच मानवी जीवन तारू शकणार आहे.
प्राचीन कालपासूनच धर्माचे राजकारण करण्याची परंपरा या देशात आहे. मगध, जम्बुद्विपा पासून भारत- हिंदुस्थान इथपर्यंतचा इतिहास पाहिल्यास आपणास स्पष्ट दिसून येईल. म्हणून विध्यार्थ्याचे ज्ञानार्जन  राजकारण या एकाच म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीशैक्षणिक संकुलात जेव्हा राजकारणाचा शिरकाव होतो तेव्हा विध्यार्थ्यांच्या पिढ्या बरबाद होतात.
"माझ्या येणा-या भविष्या | इतिहासाचे पाने चाळीत ये
नराधमांच्या क्रूर कृत्याचे | मुडदे सुखाने जाळीत ये "
हाच संदेश माझ्या येणा-या भावी पिढ्यांना आहे. जो स्वत:सह अखिल मानवाचे कल्याण चिंतील. तसे कृत्य त्याच्या मनगटातून  घडेल. मित्रांनो माझी वहिवाट ही अनवट होती. कदाचित त्यामुळेच मी इथे यशस्वीरीत्या पोहोचलो.
**************************
डॉ. पद्माकर तामगाडगे,
मराठी विभाग प्रमुख,
सिद्धार्थ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, मुंबई.

Comments

Popular posts from this blog

महिला सक्षमीकरण सुरु आहे. . .

|| सृजनवेध || महिला सक्षमीकरण सुरु आहे. . . - डॉ. पद्माकर तामगाडगे महिला सक्षमीकरणाची प्रक्रिया केव्हा पासून सुरु झाली ? याचा विचार केल्यास. लगेच ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन आठवतो आणि त्याच बरोबर आठवतो त्या घटनेमागील इतिहास. क्लारा जेटकिन या रूसी महिलेने सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला अधिवेशनाचा प्रस्ताव ठेवला होता . दर वर्षी ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जावा. तिने जगातील सर्व महिलांना आवाहन केले आणि पुरुष आणि महिलांमध्ये कुठल्याही प्रकारची दरी निर्माण होऊ नये. जर पुरुष झगडा करीत असेल तर महिलांनी शांत राहून सामंजस्याने विचार करून, शांतपणे लढावे. आणि मग १९११ पासून १९१५ पर्यंत सातत्याने ८ मार्च हा महिला दिवस म्हणून जगभर साजरा केला गेला. महिलांना संगठीत करण्यासाठी सेंट पीटर्सबर्ग शहरात ‘राबोनित्सा’ पत्रिका काढली गेली. आणि इथूनच महिलांवरील होणारे अन्याय अत्याचार, असमानता यांच्या विरोधात एक सक्षम नेतृत्व उभारल्या गेले. पहिल्या महायुद्धातील कालावधीत ओस्लो(नार्वे) मधील महिलांनी युद्धाचा निषेध दर्शविला, रशियन क्रांतीची सुरुवात ८ मार्च १९१...

तृतीयपंथीयांची अवहेलना का ?

तृतीयपंथीयांची अवहेलना का ? डॉ. पद्माकर तामगाडगे,             तृतीयपंथी, हिजडा, किन्नर, नपुंसक, षंढ असे नानाविध दुषणे लावून मानवी समाजातील एका संवेदनशील जीवाचे, माणसाचे माणूसपण हिरावून घेणे हे लाजिरवाणे नव्हे काय? जगात केवळ दोन लिंग अस्तित्वात आहे आणि ते म्हणजे स्त्री आणि पुरुष. तिसऱ्या लिंगाच्या माणसाने कुठे जायचे? त्याला जगण्याचा अधिकार नाही का ? वरील शब्द उच्चारताच हीन भाव उत्पन्न होतो. त्याचे कारण समाजाची मानसिकता हेच आहे. महाराष्ट्र शब्द कोशात दिलेल्या अर्थानुसार ‘हिजडा’ म्हणजे पुरुष वेषधारी नपुंसक, षंढ, निर्लज्ज- बीभत्स हावभाव, भाषण करणारा माणूस. किंवा निसत्व, दुबळा, पौरुष्यहीन माणूस, त्यातही पुष्टी जोडून काही हिजडे स्त्रीवेशात गावात दरसाल गरिबश्रीमान्तांकडून पैसे उकळतात त्यास वतनदार हिजडे म्हणतात. असे वर्णन येते. हे संपूर्ण हीनता व्यक्त करणारे व याच मानसिकतेतून तृतीयपंथीयांना हीन वर्तन करण्यास प्रवृत्त करणारी वागणूक हा समाज देतो. आज तृतीयापंथीयांच्या अशा बीभत्स स्थितीला समाजाची मानसिकताच जबाबदार आहे. कारण माणूस म...

अचल चेतनागृह : राजगृह -डॉ. पद्माकर तामगाडगे

अचल चेतनागृह : “राजगृह” “Education is not preparation for life: education is life itself.” John Dewey डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचा आयुष्यपट पहिला तरी जगातील प्रत्येक माणूस दिपून जातो असा लख्ख जीवन प्रवास जगातील अपवादात्मक विभूतीचाच असेल! किंबहुना फक्त डॉ. बाबासाहेबांचाच असेल... आयुष्यातील एकेक घटना आणि त्या घटना-प्रसंगांना येणारे अवघड वळण, आयुष्याच्या पावलोपावली येणारा नित्य संघर्ष. अस्पृश्यतेच्या सावटाखाली जगतांना येणाऱ्या अपमानाची झळ सोसत सर्वोच्च स्थानी पोहोचण्याचे परम ध्येय. उजेड मागत फिरणाऱ्या कफल्लक पिढ्यांना त्यांच्या झोळ्या लख्ख प्रकाशाने भरून काळोखाला प्रकाशमान करणारा हा महासूर्य. एकाच आयुष्यात अलौकिक म्हणावे, जादुई म्हणावे असे कार्य या महामानवाच्या हयातीत त्यांनी केले आहे. त्यांच्या उत्तुंग कार्याचा, व्यक्तिमत्वाचा वेध शब्दात पकडता येईल असा शब्दच कोणत्या भाषेत उपलब्ध नाही. अशाच एका पैलूचा या निमित्ताने धांडोळा या लेखाच्या निमित्ताने घेणार आहोत. महामानव डॉ. बाबासाहेबांचे एकूण आयुष्य पहिले तर प्रत्येक गोष्टीसाठी धडपड आहे. कोणतीच गोष्ट त्यांना सहजासहजी प्राप्त झाली नाह...