विठाबाई नारायणगावकर
मोत्याच्या बाजारी जाऊन वस्त्र फाटके अंगाला
गळ्यात शोभे माणिक हा अन् लाज वाटते देहाला.
कला अंगीभूत जल्माचीही पोशिंदी तनमनाला
बघती नजरा दांभिक त्यांच्या चपराक हो कुळाला.
दिसे बाज नटरंगी हास्य सतेज नित्य मुखकमला
अठराविश्वे दारिद्रयाचे सत्य न दिसती कोणाला ?
बाळंतीन तू मंचावरती गोंडस झाले बाळ तुला
ओटी पोटी बांधून नाचली सभामंडपही गहिवरला
कलावंतीण तू ख-या कुळाची रसिक श्रोता जागविला
दिलास ऐसा विठा दागिना शास्त्रकलेला नमविला.
पद्माकर तामगाडगे , मुंबई. . .
Dada tujhyasarkhya Kalawantakadun Hya kalawantanna dileli aadaranjali abhinandanas patra aahe. Aajachya pidhila ashya Kalawantanchya karyachi punha ekda Athawan karun dilyabaddal tujhe abhinandan.
ReplyDeletewa kharach farach sundar....
ReplyDelete