Skip to main content

"आंबेडकरवाद" वादच नको?

"आंबेडकरवाद" वादच नको?

आंबेडकरवाद" म्हणजे धर्म जात पंथ या सगळ्यांच्या अतीत जाऊन. अखिल विश्वाच्या मानवाच्या कल्याणाचा नवा जीवन मार्ग आहे. भारताच्या दृष्टीने जर त्याचा विचार केला तर साठोत्तरी समाजातील जे काही स्थित्यंतरे झाली आहे ती केवळ आणि केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच  झाली आहे.  ग्रामीण समाज असो की शेतकरी, आदिवासी, शोषित-पिडीत, स्त्रिया इ. समाजातील तत्कालीन वंचित व दुर्लक्षित घटकांना या समाजव्यवस्थेने सर्व घटकांपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले. परंतु या घटकांना त्यांच्यावर होणारा अन्याय अत्याचार आजपर्यंत काळत नव्हता? कळला तरी व्यवस्थेच्या तटबंदिमुळे त्यांचे शब्द मुके होते. हीवास्तवता कुणीही नाकारू शकणार नाही. अतिशय दुर्लक्षित असणा-या अतिदुर्गम भागात शिक्षणाच्या सोयी उपलब्ध नव्हत्या, रस्ते, वीज, या भौतिक बाबी तर दूरच सध्या मुलभूत जीवनावश्यक गरजांचीही मारामार होती. या सगळ्या घटकांना स्वत्वभान नव्हते. ते स्वतःवर होणा-या अन्यायाला स्वतःच्या कर्माचे फळ समाजत होते. परिणामतः शतकानुशतके गुलामिचीच अवस्था या वर्गाची राहिली आहे. ही  स्थिती बदलली त्यामागे काही घटना कारणीभूत आहे... एक म्हणजे टिळकांचे निधन होऊन स्वराज्याचे सूत्र, स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व महात्मा गांधींकडे आले. त्यानंतर या देशात अनेक इजम (ISM ) आले. मार्क्सवाद, समाजवाद, स्त्रीवाद, हिन्दुइजम इ., स्वातंत्र्याचे वेध लागलेली तरुण पिढी एकीकडे आणि सामाजिक समतेची लढाई लढणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समान प्रवाह एकाच वेळेत समान ताकतीने सुरु होते. नंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले. ही घटनाही देशातील पीडित, शोषितांच्या जीवनाला कलाटणी देणारीच होती. मात्र खरी उलथा-पालथ झाली ती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्य घटनेच्या  अंमलबजावणीमुळे. भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून देशातील शेवटच्या माणसापर्यंत शिक्षण पोहचले की जे शिक्षण फक्त ब्राह्मणांनाच मिळायचे ते या घटनेच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचले. त्यातून ते सजग झाले व स्वतःवर होणारे अन्याय त्यांना कळू लागले. या घटना अंमलबजावणी नंतर आणखी एक घटना घडली ज्यामुळे विश्वातील अखिल माणसांचे डोळे दीपून गेले. ती म्हणजे “नाभूतोनाभाविष्यति" अशी धम्मचक्र प्रवर्तन या घटनेमुळे ग्रामीण शेतकरी, स्त्रिया शोषित पीडित-वंचित सगळेच खळबळून जागे झाले आणि आपआपले दु:ख कधी शब्दांच्या माध्यमातून साहित्याचा रूपातून, तर कधी त्या अन्यायाला प्रतिकार करून, न्याय्य मागणीसाठी लढा देऊन, अनेक चळवळी, आंदोलने उभी राहिली. त्याचे एकमेव कारण होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर. म्हणूनच बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर साहित्यातूनही नकार, विद्रोह आणि आत्मभान हे सगळ्याच साहित्य प्रवाहातूनही दिसते. केवळच "दलित" साहित्यावरच हा प्रभाव आहे तसेच  साठोत्तरी साहित्यावर हा परिणाम आहे शिवाय  ग्रामीण, स्त्रीवादी, आदिवासी इ,इ, सगळ्याच साहित्य व चळवळींचे प्रेरणास्थान हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरच आहे हे मान्य करावेच लागते.
बुद्धांचा धम्मसुद्धा डॉ. आंबेडकरांनीच पहिल्यांदा सर्वसामान्यांपर्यंत आणला. त्यामुळेच जगाला पुन्हा एकदा बुद्ध आणि त्यांचा धम्म दिसला. जर बाबासाहेब नसते तर आज बुद्धही कोणाला माहीत नसते ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सर्व नद्या जशा समुद्राला जाऊन मिळतात तसा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समुद्रासारखे आहे. सर्व प्रवाह त्यात सामावून घेता येतात की जे मानवतावादी आहे. त्यामुळे कुणीही "आंबेडकरवाद" या संकल्पानेशिवाय दुस-या  संकल्पनेचा विचार करू नये.
पूर्वग्रह असल्यामुळे, व वैयक्तिक विरोधामुळे काही आंबेडकरी मंडळी केवळ विरोधासाठी विरोध म्हणून ही संकल्पना नाकारतात व बाबासाहेब आंबेडकरांना मागे सरतात. हा त्यांचा द्रोह आहे.  केवळ "संकल्पनेचे श्रेय आपल्यालाच मिळावे इतर कुणालाही मिळू नये त्यासाठी रास्त असणाऱ्या "आंबेडकरवादी" संकल्पनेला वगळून आपापले घोडे पुढे दामटणे ही बाब नैतिकतेला धरून तर नाहीच आहे उलट अशा व्यक्तिवादी पूर्वग्रहीतांचा आंबेडकरी समाजास धोकाच आहे म्हणून अशा ढोंगी व स्वार्थी लोकांपासून वेळीच सावध झाले पाहिजे.
"आंबेडकरवाद" म्हणजे जात, धर्म, वंश, पंथ याच्या अतीत जाऊन स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय अशा मानवतावादाचे नाव आहे. जसे जय-भीम ला दुसरा पर्याय नाही तसेच आंबेडकरवादाला  देखील पर्याय नाही.
--------जय भीम------
प्रा. डॉ. पद्माकर तामगाडगे, मुंबई.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

महिला सक्षमीकरण सुरु आहे. . .

|| सृजनवेध || महिला सक्षमीकरण सुरु आहे. . . - डॉ. पद्माकर तामगाडगे महिला सक्षमीकरणाची प्रक्रिया केव्हा पासून सुरु झाली ? याचा विचार केल्यास. लगेच ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन आठवतो आणि त्याच बरोबर आठवतो त्या घटनेमागील इतिहास. क्लारा जेटकिन या रूसी महिलेने सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला अधिवेशनाचा प्रस्ताव ठेवला होता . दर वर्षी ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जावा. तिने जगातील सर्व महिलांना आवाहन केले आणि पुरुष आणि महिलांमध्ये कुठल्याही प्रकारची दरी निर्माण होऊ नये. जर पुरुष झगडा करीत असेल तर महिलांनी शांत राहून सामंजस्याने विचार करून, शांतपणे लढावे. आणि मग १९११ पासून १९१५ पर्यंत सातत्याने ८ मार्च हा महिला दिवस म्हणून जगभर साजरा केला गेला. महिलांना संगठीत करण्यासाठी सेंट पीटर्सबर्ग शहरात ‘राबोनित्सा’ पत्रिका काढली गेली. आणि इथूनच महिलांवरील होणारे अन्याय अत्याचार, असमानता यांच्या विरोधात एक सक्षम नेतृत्व उभारल्या गेले. पहिल्या महायुद्धातील कालावधीत ओस्लो(नार्वे) मधील महिलांनी युद्धाचा निषेध दर्शविला, रशियन क्रांतीची सुरुवात ८ मार्च १९१...

तृतीयपंथीयांची अवहेलना का ?

तृतीयपंथीयांची अवहेलना का ? डॉ. पद्माकर तामगाडगे,             तृतीयपंथी, हिजडा, किन्नर, नपुंसक, षंढ असे नानाविध दुषणे लावून मानवी समाजातील एका संवेदनशील जीवाचे, माणसाचे माणूसपण हिरावून घेणे हे लाजिरवाणे नव्हे काय? जगात केवळ दोन लिंग अस्तित्वात आहे आणि ते म्हणजे स्त्री आणि पुरुष. तिसऱ्या लिंगाच्या माणसाने कुठे जायचे? त्याला जगण्याचा अधिकार नाही का ? वरील शब्द उच्चारताच हीन भाव उत्पन्न होतो. त्याचे कारण समाजाची मानसिकता हेच आहे. महाराष्ट्र शब्द कोशात दिलेल्या अर्थानुसार ‘हिजडा’ म्हणजे पुरुष वेषधारी नपुंसक, षंढ, निर्लज्ज- बीभत्स हावभाव, भाषण करणारा माणूस. किंवा निसत्व, दुबळा, पौरुष्यहीन माणूस, त्यातही पुष्टी जोडून काही हिजडे स्त्रीवेशात गावात दरसाल गरिबश्रीमान्तांकडून पैसे उकळतात त्यास वतनदार हिजडे म्हणतात. असे वर्णन येते. हे संपूर्ण हीनता व्यक्त करणारे व याच मानसिकतेतून तृतीयपंथीयांना हीन वर्तन करण्यास प्रवृत्त करणारी वागणूक हा समाज देतो. आज तृतीयापंथीयांच्या अशा बीभत्स स्थितीला समाजाची मानसिकताच जबाबदार आहे. कारण माणूस म...

अचल चेतनागृह : राजगृह -डॉ. पद्माकर तामगाडगे

अचल चेतनागृह : “राजगृह” “Education is not preparation for life: education is life itself.” John Dewey डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचा आयुष्यपट पहिला तरी जगातील प्रत्येक माणूस दिपून जातो असा लख्ख जीवन प्रवास जगातील अपवादात्मक विभूतीचाच असेल! किंबहुना फक्त डॉ. बाबासाहेबांचाच असेल... आयुष्यातील एकेक घटना आणि त्या घटना-प्रसंगांना येणारे अवघड वळण, आयुष्याच्या पावलोपावली येणारा नित्य संघर्ष. अस्पृश्यतेच्या सावटाखाली जगतांना येणाऱ्या अपमानाची झळ सोसत सर्वोच्च स्थानी पोहोचण्याचे परम ध्येय. उजेड मागत फिरणाऱ्या कफल्लक पिढ्यांना त्यांच्या झोळ्या लख्ख प्रकाशाने भरून काळोखाला प्रकाशमान करणारा हा महासूर्य. एकाच आयुष्यात अलौकिक म्हणावे, जादुई म्हणावे असे कार्य या महामानवाच्या हयातीत त्यांनी केले आहे. त्यांच्या उत्तुंग कार्याचा, व्यक्तिमत्वाचा वेध शब्दात पकडता येईल असा शब्दच कोणत्या भाषेत उपलब्ध नाही. अशाच एका पैलूचा या निमित्ताने धांडोळा या लेखाच्या निमित्ताने घेणार आहोत. महामानव डॉ. बाबासाहेबांचे एकूण आयुष्य पहिले तर प्रत्येक गोष्टीसाठी धडपड आहे. कोणतीच गोष्ट त्यांना सहजासहजी प्राप्त झाली नाह...