बाप नावाचा माणूस 'बाप' हा कोणत्या रसाचा संयोग आहे? आपण जाणताच 'उत्साह' त्याचा स्थायी आहे. सुखदुःखाची पिळदार वीण कधी सैल होऊ देत नाही कोसळणार्या दुःखाची आप्तांना झळ बसू देत नाही इवल्याशा पंखात आभाळ सामावणारा जागल्या आहे डोळ्यांत करुणा पण अश्रूंची त्याला मनाई आहे आपण जाणताच 'उत्साह' त्याचा स्थायी आहे. शृंगाराचा भूतकाळी डेटा रिसायकलबीन मध्ये आहे विभाव आलंबनाचा प्रत्यय घ्यायला फारंच रसविघ्ने आहे मंचावरचा रंग आता भयंकराच्या आवर्तात फिरतोय भावाचा संचार सदोदित भवतालात भीरभीरतोय रौद्राची ढाल अन् क्रोधाची तलवार हीच कमाई आहे आपण जाणताच 'उत्साह' त्याचा स्थायी आहे. बिभत्सतेचा स्वानुभव क्षणाक्षणाला झेलून घेतो अदभूताच्या विहंगतेला अंतरंगी रेलून देतो जुगुप्सा नाही, विस्मय नाही कष्टाने तो कातळ होतो असे नाही रे ! संसाराचा अवघा रस पातळ होतो? मिळून अवघ्या आठ रसाचा फक्त 'बाप'च स्थायी आहे आपण जाणताच 'उत्साह' त्याचा स्थायी आहे. 'बाप' नावाच्या सात्विकतेला अनुभावाचे वावडे आहे सानथोरांच्या हर्षक्षणांचे त्याच्यासाठी सोहळे आहे अं...