तो भीम आम्ही पहिला बुद्ध रूपाचा परीस ज्याने दलितांना दाविला तम खाणीतून लखलखणारा कोहिनूर घाविला तो भीम आम्ही पहिला, तो भीम आम्ही पहिला II धृ II उकिरडयात पडलेला माणिक पैलू तया पडिला स्वतेज इतका पाजळला की क्रांत्युत्सव घडला तो भीम आम्ही पहिला . . . . अजाण होता समाज माझा वाली तया न उरला गावकुसातून अतीव वेदना सोसुनी जगाला तो भीम आम्ही पहिला. . . . बहुजन हिताय- बहुजन सुखाय मार्ग जगाला दिला बुद्धाचा संदेश भीमाने घटनेने रुजविला ...