माणसा तुझ्या कोणत्या दिशा तुला बाध्य आहे? माणसा तुझ्या कोणत्या दिशा तुला बाध्य आहे? तुझ्या मुक्त विहंगला जात-भाषा-प्रांतांचे कसले कडे आहे? कोलंबसाला चहूदिशांनी विचारले? सागराच्या लाटांनी फटकारले? आशिया खंडाच्या दाराशी येऊन, त्याने कोणत्या भाषेत सुसंवाद केला? अमेरिगो व्हेस्पुसीने भारतीय खलाशाला, आधी जात-धर्म-भाषा विचारली असेल का? वास्को-द-गामा तू जवळ होता, खऱ्या जम्बुद्विपाच्या तू आलास पण तुला भारत सापडला नाही. युरोप ते भारत फक्त प्रवास झाला. इथे इसवीसनापूर्वीच भूमंडलीकरण अवगत होते माणसांच्या माणूसपणाचे सर्वत्र बिगूल वाजत होते. चार्वाक, बुद्ध नावाचे दार्शनिक भूमीच्या कणाकणात तेवत होते वैश्विक माणूस घडविण्याचा तत्त्वांश याच भूमीत रुजला कोलंबसा-व्हेस्पुसी-वास्को तुमचे ध्येय व्यापाराचे तुमच्या हेतूंना स्वार्थाची किनार साधनाला निर्धन आणि निर्धनांची शोषण शृंखला जहाजात टाकून इथे कशाला आणलीस... उत्तरेतील गोचीड आधीच पोट फुगवून तडकताहेत चले जाव!... चले जाव !!... असे आमच्या श्रमण संस्कृतीत बसत नाही नाहीतर केव्हाच पृथ्वी पादाक्रांत के...