शाहीर मरण कसं मरणालाही लाजवून गेले. 'जय-भीम', 'जय-बुद्ध' चा निनाद स्मरणात ठेऊन गेले. साक्षीला दीक्षाभूमी अन धम्माचे चौफेर वारे गहिवरून याव आभाळ तसं कोसळून गेले. कला तुझी, कीर्ती तुझी अजरामर झाली समतेची शाहिरी नक्षी कोरून गेले. जांभूळआख्यान, छक्कड, तुझं कोलियाचं गाणं जगणं-मरणं गाणं, मरणं भीम-बुद्ध सांगून गेले. हळहळला समाज सारा, तुला आपला म्हणणारा अमर झाल मरण दादा, दु:ख हरखून गेले. वाटे अंत जीवनाचा तुझ्यासम यावा, मरणाचाही वाटावा हेवा ऐसे दान देऊन गेले. -"ग्लासनोस्त" (openness ) या माझ्या येणा-या नव्या काव्यसंग्रहातून - पद्माकर तामगाडगे मुंबई